शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

पाण्यातूनही कोरोना व्हायरस पसरू शकतो?, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं मत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:48 IST

कोरोना व्हायरस मल किंवा घाणेरड्या पाण्यात काही वेळासाठी सक्रिय राहतो. पण पाण्यात हा व्हायरस किती वेळ जिवंत राहतो याचा काहीही पुरावा समोर आला नाही.

देशव्यावी लॉकडाऊनमधे कोरोना व्हायरसचं थैमान वाढतंच आहे. कोरोनाची लागण होणारे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सतत कोरोनाबाबत वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. अशात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यांचं असं मत आहे की, कोरोनासाठी जबाबदार व्हायरस घाणेरड्या किंवा अशुद्ध पाण्यात जास्त वेळ जिवंत राहू शकतो. 

sciencedirect.com च्या वृत्तानुसार, World Health Organisation (WHO) मार्च महिन्यातच स्पष्ट केलं होतं की, कोरोना व्हायरस पाण्यातून पसरत नाही. तो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या शिंकल्याने व खोकल्याने पसरतो. तर ऑनलाइन जर्नल केडब्लूआर (KWR) च्या 24 मार्चच्या अंकात नेदरलॅंडच्या वैज्ञानिकांनी दावा केला होता की, त्यांच्या तिथे वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये कोरोना व्हायरसचे तीन सक्रिय जीन्स मिळाले आहेत. याचप्रमाणे UK Centre For Ecology & Hydrology नुसार,  कोरोना व्हायरस मल किंवा घाणेरड्या पाण्यात काही वेळासाठी सक्रिय राहतो. पण पाण्यात हा व्हायरस किती वेळ जिवंत राहतो याचा काहीही पुरावा समोर आला नाही.

सार्सवेळीही हेच पाहिलं होतं

Environmental Science: Water Research & Technology मध्येही याच्याशी मिळत्या-जुळत्या आशयाचा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. University of California च्या वैज्ञानिकांसहीत University of Salerno वैज्ञानिकांनी देखील या रिसर्चमध्ये सहभाग घेतला होता. या रिसर्चचा हा उद्देश होता की, पाण्यातही SARS-CoV-19 व्हायरस जिवंत राहतो का आणि जिवंत राहिला तर किती वेळ राहतो. तसेच याचा आरोग्यावर किती परिणाम होतो.

यातून असं समोर आलं की, 2002-03 मध्ये सार्स वेळी सुद्धा पाण्याच्या पाईपमध्ये लिकेज असल्यावर पाण्याचे थेंब ऐरोसॉलच्या माध्यमातू हवेत पोहोचले होते आणि याच कारणाने सार्सच्या केसेस अधिक वाढल्या होत्या. हॉंगकॉंगमधे झालेल्या रिसर्चमध्ये पाणी आणि कोरोना यात थेट संबंध दाखणवण्यात आला होता.पण कोविड-19 बाबत आतापर्यंत अशी एकही केस समोर आली नाही. पण एका फॅमिलीचे सर्व पॅथोजन एकाच प्रकारे प्रतिक्रिया करतात. त्यामुळे इथेही पाण्याच्या सीवेज किंवा लीकेजने कोरोना संक्रमण वाढू शकतं. व्हायरस पाण्याच्या थेंबांच्या माध्यमातून हवेत पसरू शकतो. या प्रक्रियेला शॉवरहेड्स एअरोसोल ट्रान्समिशन म्हणतात. 

कसा करू शकता बचाव

वॉटर ट्रीटमेंटच्या माध्यमातून पाण्यातील पॅथोजनपासून बचाव केला जाऊ शकतो. एक्सपर्टंनुसार, जास्तीत जास्त वॉटर ट्रीटमेंट याचप्रकारे बनते. जे पिण्याच्या पाण्यातीलच नाही तर घाणेरड्या पाण्यातूनही कोरोनाला नष्ट करते. केमिकल हायपोक्लोरस अ‍ॅसिड आणि पॅरसिटिक अ‍ॅसिडसोबत ऑक्सिकरणची प्रोसेस पाणी स्वच्छ करण्याची प्रसिद्ध पद्धत आहे. 

वैज्ञानिकांचं असं मत आहे की, जिथे जिथे कोरोना संक्रमण पसरत आहे, तिथे पिण्याची पाण्याची किंवा वापरणाऱ्या पाण्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे. खासकरून कोरोनाच्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांवर यावर काम केलं पाहिजे. हॉस्पिटल्समध्येही याची काळजी घेतली गेली पाहिजे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन