शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खुशखबर! भारतात लॉन्च झालं कोरोनाचं नवीन औषध; १०० मिलीग्रॅममध्ये उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 14:13 IST

CoronaVirus News & Latest Upadtes : हल्की, मध्यम लक्षणं असलेल्या  कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर केला जातो.  डॉ. रेड्डी लेबोरेट्रीज ने 'एविगन' चे 200 एमजीचे 122 टॅब्लेट असलेलं पाकिट बाजारात आणलं होतं.

जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे आतापर्यंत 2 कोटी 77 लाख रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होत असल्यांची संख्या 9 लाखांपेक्षा जास्त आहे. या जीवघेण्या माहामारीला रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.  अजूनही अनेक देशांना या माहामारीला पूर्णपणे रोखण्यात यश मिळालेलं नाही. वेगवेगळ्या कंपन्याकडून कोरोना रुग्णाचे उपचार करण्यासाठी जेनेरिक औषधं लॉन्च केली जात आहेत.

भारतातील प्रसिद्ध कंपनी डॉ. रेड्डी लेबोरेट्रीजनं बुधवारी कोरोना संक्रमित रुग्णाचे उपचार करण्यासाठी रेमडीसीवर  हे औषध लॉन्च केलं आहे.  हे औषध बाजारात आणण्याची घोषणा केली  जात आहे.  रेडायक्स ब्रँण्ड नावानं हे औषध उपलब्ध होणार आहे. औषध तयार करत असलेल्या कंपनीनं गिलीड साइंसेज इंक (गिलीड)सोबत मिळून लाइसेंसची व्यवस्था केली आहे.  

डॉ. रेड्डी लेबोरेट्रीजला रेमडेसिवीरची नोंदणी, निर्माण आणि विक्री यांचे अधिकार देण्यात आले आहेत. भारतासह 127 देशात कोरोनाचे संभाव्य उपचार करण्यासाठी या औषधाचा वापर केला जात आहे. (डीसीजीआई) कडून  गंभीर स्थितीतील कोरोनारुग्णांवर  रेमडेसिविरनं उपचार करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डॉ. रेड्डीज च्या रेडायक्स 100  मिलिग्रॅम च्या लहान बाटलीत हे औषध उपलब्ध असेल. डॉ. रेड्डी लेबोरेट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एम व्ही रमन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार आजारांवर उपचार करण्याच्या  गरजा पूर्ण होतील अशी औषध तयार करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. 

मागच्या महिन्यात डॉ. रेड्डी लेबोरेट्रीजनं कोरोनाचं औषधं लॉन्च केलं होतं. या औषधाचे नाव एविगन आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हल्की, मध्यम लक्षणं असलेल्या  कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर केला जातो.  डॉ. रेड्डी लेबोरेट्रीज ने 'एविगन' चे 200 एमजीचे 122 टॅब्लेट असलेलं पाकिट बाजारात आणलं होतं.  याशिवाय ४२ शहरांमधये होम डिलिव्हरी सेवा देण्याचाही दावा केला होता. या कंपनीनं औषधाच्या किमतीबाबत माहिती दिलेली नाही. 

अमेरिकेनं दिली खुशखबर; ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस मिळणार 

दरम्यान कोरोना लसीबाबत अमेरिकेत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. अमेरिकन फार्मा कंपनी फायजरची लस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकते. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक उगुरसहिन यांनी स्थानिक  वृत्त वाहिनीशी बोलताना ही माहीती दिली आहे. फायजरची लस ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ही लस अमेरिकन कंपनी फायजर आणि जर्मन कंपनी बायोएनटेकने मिळून तयार केली आहे. रिपोट्सनुसार बायोएनटेकच्या तज्ज्ञांनी  या लसीवर विश्वास दाखवत सांगितले की, ''आमच्याकडे एक सुरक्षित लस तयार आहे. ही लस कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरेल. लस घेत असलेल्या स्वयंसेवकांना ताप आल्याची लक्षणं दिसून आली आहेत. याशिवाय डोकेदुखी,  अंगदुखी, थकवा येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला आहे.''

या लसीचे तिसया टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे.  जुलै महिन्यात फायजर आणि बायोएनटेक या दोन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस मानवी परिक्षणातील शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. आता हे परिक्षण सफल ठरल्यास ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत लस उपलब्ध होऊ शकते.  त्यानंतर सरकारच्या परवानगीसाठी निवेदन देण्यात येणार आहे.  कंपनीनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2020 च्या शेवटापर्यंत लसीचे 10 कोटी आणि 2021 च्या शेवटापर्यंत लसीचे  1.3 अब्ज डोस तयार केले जातील. अमेरिकेतील सरकारनं फायजरसोबत 10 कोटी डोस खरेदी करण्यासाठी  करार केली आहे.  या करारानुसार गरज पडल्यास लसीचे 50 कोटी डोज तयार करण्यास सांगितले जाणार आहे. 

फायर्स फार्मामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार फायजर आणि बायोएनटेक कंपनीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसची ही लस  अमेरिकन सरकारला 19.50 डॉलर प्रति डोज म्हणजेच 1500 रुपये प्रति डोज विकली  जाणार आहे. यासाठी त्यांना 40 डॉलर म्हणजचे  3 हजार रुपये देण्याची आवश्यकता भासू शकते. दरम्यान लसीकरणास सुरूवात झाल्यास लसीची किंमत जवळपास  1 हजार 500  रुपयांपर्यंत असू शकते. 

हे पण वाचा-

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात अमेरिकेनं दिली खुशखबर; ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस मिळणार 

लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या