लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 11:53 AM2020-09-11T11:53:53+5:302020-09-11T12:05:31+5:30

आपातकालीन स्थितीत या लसीच्या उत्पादनासाठी चीनच्या काही खासगी कंपन्याना परवागनी देण्यात आली आहे. 

coronavirus vaccine updates china first nasal spray covid19 vaccine approved for clinical trials | लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात 

लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात 

googlenewsNext

जगभरात कोरोनानं कहर केला आहे. कोरोना रुग्णांची धडकीभरवणारी आकडेवारी देशभरातून समोर येत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गंभीर आजारात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. कोरोना विषाणूंचा खात्मा करणारी लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. देशात दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. कोरोना चाचण्या, क्वारंटाईन, मास्क, सोशल डिस्टंसिंग याच्या माध्यमातून काळजी घेतली जात असतानाच रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान चीनमधून एक सकरात्मक माहिती समोर येत आहे.

चीनमधील तज्ज्ञांनी कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. नेजल स्प्रे च्या स्वरुपात ही लस असेल. या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाली असून नोव्हेंबरपर्यंत या लसीच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलची सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी  जवळपास  १०० लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, झीमान युनिव्हर्सिटी आणि बिजिंग वातांय बायोलॉजिकल फार्मसीमधील शास्त्रज्ञांकडून ही लस तयार करण्यात आली आहे.

चीनच्या  नॅशनल मेडिकल प्रोडक्ट्स एडमिनिस्ट्रेशनकडून या लसीला परवानगी देण्यात आली आहे. 
युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे मायक्रोबायोजिस्ट आणि प्रमुख शास्त्रज्ञ युयेन याँग यांनी दिलेल्या माहितीनुसार  या लसीमुळे व्हायरसला प्रवेशमार्गात म्हणजेच नाकातून शरीरात जाण्यापासून रोखता येऊ शकतं. तसंच या लसीमुळे कोरोना व्हायरशी लढण्यासाठी एंटीबॉडी विकसित करण्यास मदत होईल. या लसीच्या लसीकरणासाठी दुप्पटीनं खबदारी घेतली जाणार आहे.  कोरोना व्हायरस आणि इन्फ्लुएंजा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ही लस परिणामकारक ठरेल. या नाकाद्वारे दिल्या जात असलेल्या लसीच्या तिन्ही चाचण्या पूर्ण करण्यासाठी जवळपास एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. 

पुढे त्यांना सांगितले की, इन्जेक्शनच्या तुलनेत नाकाद्वारे दिली जाणारी लस मोठ्या प्रमाणावर लोकांचा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तसंच उत्पादनासाठी सोईची ठरणार आहे. याशिवाय या लसीमुळे श्वसनप्रणालीवर कोणताही वाईट परिणाम दिसून येणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आपातकालीन स्थितीत या लसीच्या उत्पादनासाठी चीनच्या काही खासगी कंपन्याना परवागनी देण्यात आली आहे. 

मे महिन्यापर्यंत तब्बल 64 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग; ICMRचा धक्कादायक खुलासा

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सीरो सर्वेक्षणांचा निकाल समोर आला आहेत. यामधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती.

कोरोनाची जेव्हा देशभर लॉकडाऊन सुरू होता तेव्हा कोरोनाची अशी अवस्था होती. सीरो सर्वेक्षणातून ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही किंवा कमी रुग्ण आढळले अशा ठिकाणी कोरोना चाचण्याच कमी प्रमाणात झाल्या असाव्यात. चाचण्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे.

जेणेकरून रुग्णांबाबत माहिती मिळणं सोपं होतं. तसेच काही ठिकाणी लॅब वाढण्याची गरज असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे. ग्रामीण भागात सेरो पॉझिटिव्हिटीचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 69.4 टक्के होतं तर शहरी झोपडपट्ट्यांमध्ये ते 15.9 टक्के आणि शहरी नसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये 14.6 टक्के नोंदवलं गेलं आहे. 18-45 वर्षे (43.3) वयोगटात सीरो पॉझिटिव्हिटी सर्वाधिक असून 46-60 वर्षे (39.5) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांत कमी सेरो पॉझिटिव्हिटी आहे.

हे पण वाचा-

हाताने नाकावरचे पिंपल्स फोडणं चांगलंच अंगाशी आलं; मेंदूत झालं गंभीर इन्फेक्शन अन् मग...

कोरोनाची लस घेतली, महिलेच्या हाडांना सूज आली... ऑक्सफर्डने सांगितलं चाचणी का थांबवली!

Read in English

Web Title: coronavirus vaccine updates china first nasal spray covid19 vaccine approved for clinical trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.