शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रेकॉर्डब्रेक, भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट

By बाळकृष्ण परब | Updated: September 22, 2020 11:19 IST

देशात सुरू असलेला कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्दे काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी केली कोरोनावर मात देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहेदेशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे

नवी दिल्ली - गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल एक लाख रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर कालच्या दिवसभरात नव्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसून आली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले आहेत.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल देशभरामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख, ६२ हजार ६६३ एवढी झाली आहे. तर या २४ तासांत एक हजार ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८८ हजार ९३५ एवढा झाला आहे. 

मात्र या सर्वामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे भारतामध्ये काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहे. तर देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८०.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १.६० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १८.२८ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार २१ सप्टेंबरपर्यंत देशात सहा कोटी ५३ लाख, २५ हजार ७७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ९ लाख ३३ हजार, १८५ नमुन्यांची चाचणी ही सोमवारी करण्यात आली.महाराष्ट्रातही घटली नव्या कोरोनाबाधितांची संख्यादेशात कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रामधूनही काल दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात १५ हजार ७३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ३२ हजार ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या २४ तासांत राज्यात ३४४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ३३ हजार १५ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य