शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

WHO चा धोक्याचा इशारा; पुढच्या २ आठवड्यात रोज १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 11:19 IST

CoronaVirus News Updates : WHOने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यात रोज एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाच्या  केसेस समोर आल्या आहेत. तसंच आता पुढील पंधरा दिवस रुग्णांची संख्या याच वेगाने वाढू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा वाढता प्रसार पाहता धोक्याची सुचना दिली आहे. आशिया, दक्षिण अमेरिका आणि मिडल ईस्टमधील देशांमध्ये कोरोनांचं संक्रमण वेगाने पसरत राहणार आहे. WHOने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यात रोज एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाच्या  केसेस समोर आल्या आहेत. तसंच आता पुढील पंधरा दिवस रुग्णांची संख्या याच वेगाने वाढू शकते. बिजिंगमध्ये कोरोना विषाणूं पसरण्याचं प्रमाण वाढत आहे. यातून लवकरात लवकर बाहेर येण्याासाठी मार्ग शोधायला हवा. असं WHOने चीनला  सुचना देताना म्हटलं आहे. 

WHO  चे प्रमुख टेडरॉस एडहॉम यांनी सांगितले की, ५० दिवसांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा गंभीर स्थिती दिसून येत आहे. बिजिंगमध्ये वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सावध राहायला हवं. WHO चे आपातकालीन  व्यवस्थेचे प्रमुख मायकल रेयान यांनी सांगितले की,  संयुक्त राष्ट्र हेल्थ एजेंसीसुद्धा बिजिंगमध्ये पसरत असलेल्या संक्रमणाच्या मुद्द्यावरून चीनच्या संपर्कात आहे.  जर चीनला कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज भासली तर WHO ची टीम  चीनमध्ये पाठवण्यात येणार आहे. १० देशांतून ८० टक्के नवीन केसेस समोर येत आहेत. 

टेडरॉस यांनी सांगितले की जगभरात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत आहे. त्यातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण हे १० देशातील आहे. त्यातील सगळ्यात जास्त रुग्ण ब्राजील, अमेरिका, भारत, रूस, पेरू, चिली, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधून दिसून येत आहेत.  दक्षिण आशियाई देशात कोरोनाचा प्रसार वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर होत आहे.  

आफ्रिकेत ही माहामारी वेगाने पसरू शकते

WHO ने दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेत कोरोनाच्या माहामारीचा वेगाने प्रसार होत आहे. WHO चे आफ्रिकेचे प्रमुख माशिदिसो मोइती यांनी सांगितले की, आफ्रिकेतील ५४ देशांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त सामुहिक संक्रमण होण्याला सुरूवात झाली असून ही गंभीर स्थिती आहे. युरोपातून शिरकाव झाल्यानंतर शहरी भागात, व्यावसाईक केंद्रामध्ये, ग्रामीण भागात हा विषाणू पसरत  गेला आहे.

मोइती यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची लस जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. आफ्रिकेत सध्या कोरोनाच्या संक्रमणाचे २ लाख ५४ हजार केसेस समोर आल्या आहेत. तर ६ हजार ७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. 

दिलासादायक! कोणत्याही साईड इफेक्टशिवाय चीनच्या 'या' लसीने कोरोनाला हरवता येणार; तज्ज्ञांचा दावा

डिप्रेशनला बळी पडला होता सुशांत सिंह राजपूत; जाणून घ्या या डिप्रेशनची लक्षणं आणि उपाय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स