शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus News :समजून घ्या ‘कोरोना’; उगीचच मल्टी व्हिटॅमीनच्या गोळ्या घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 05:43 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : सध्या अशा मल्टी व्हिटॅमीन गोळ्याच्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंगसह मल्टी व्हिटॅमीनच्या महागड्या गोळीची जाहिरात करतो, जी वारंवार दाखवली जात आहे.

सध्या कोरोनाच्या भीतीपोटी अनेक जण रोज मल्टी व्हिटॅमीनच्या गोळ्या घेत आहेत. औषध दुकानांवर या गोळ्यांचा खप प्रचंड वाढला आहे. व्हिटॅमीन डी व शाकाहारी लोकांना व्हिटॅमीन बी-१२, फोलिक अ‍ॅसिड सोडले तर इतर सर्व व्हिटॅमिन हे मुबलक प्रमाणात फळे, भाज्या, खाद्य पदार्थांमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही स्वस्थ असाल व तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला मल्टी व्हिटॅमीनच्या गोळ्यांची गरज नाही.

सध्या अशा मल्टी व्हिटॅमीन गोळ्याच्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंगसह मल्टी व्हिटॅमीनच्या महागड्या गोळीची जाहिरात करतो, जी वारंवार दाखवली जात आहे. काही जाहिरीतींमध्ये आता ‘कोरोना’चे संदर्भ दिले जात आहेत. अशा जाहिरातींना कोणीही भुलू नये. बरेच जण व्हिटॅमीन सीच्या गोळ्यांचे ही सेवन करत आहेत.

तुम्ही रोज अर्धे लिंबू पाण्यात पिळून घेतले, तरी तुम्हाला पुरेसे व्हिटॅमीन सी मिळते. तसेच, चांगला आहार असणाऱ्यांच्या शरीरात व्हिटॅमीन सीचा साठा चांगला असतो म्हणून रोजच लिंबू पाण्यात घ्यायला हवे, असाही काही नियम नाही. आपण आपल्या नियमित आहारात अधूनमधून लिंबू पिळून घेतोच. तेवढेही पुरेसे ठरेल. तसेच प्रोटिन सप्लीमेंट्स घेण्याचीही गरज नाही. व्हिटॅमीन-डी मात्र सगळ्यांना घेण्याची गरज असते. हे सोडून दुसरी घेण्याची गरज पडू शकते अशी गोष्ट म्हणजे लोह म्हणजे आयर्न. डॉक्टरांच्या परवानगीने फक्तपुढील काही जणांना काही सप्लीमेंट्सची गरज पडू शकते.- लहान मुले : आयर्न, कॅल्शियम- गरोदर माता : फोलिक अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शियम- गुटखा, तंबाखू खाणारे :फोलिक अ‍ॅसिड- शाकाहारी : व्हिटॅमीन बी-१२- मद्यपान करणारे : फोलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमीन बी-६, ए , थायमीन- मधुमेह, किडनीचे आजार आणि कॅन्सर : यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार म्हणजेच आजार असले, तरी सर्वच नव्हे तर प्रत्येक आजाराप्रमाणे नेमक्या सप्लीमेंट्सची आवश्यकता असते. म्हणूनच नियमित आहार घेणाऱ्यांनी कुठले ही सप्लीमेंट्स घेण्याची गरज नाही. आजार असणाºयांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नेमकी औषधे घ्यावी.

- डॉ. अमोल अन्नदाते(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधं