शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तर घरात राहूनही तुम्हाला कोरोनाचा धोका; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 08:19 IST

CoronaVirus News: संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर; धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

वॉशिंग्टन: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा १ लाखाच्या खाली आला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडत आहेत. काही जण अजूनही खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर पडणं टाळतात. मात्र घरात असतानाही काळजी घेणं गरजेचं आहे.चिंताजनक! डेल्टा व्हेरिअंटचे लस घेतलेल्यांनाही संक्रमण; AIIMS च्या अभ्यासात गंभीर बाब समोरघरांमध्ये किंवा बंद खोल्यांमध्ये मास्क लावल्याशिवाय बोलल्यानं, संवाद साधल्यानं कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. बोलताना तोंडातून विविध आकाराचे थेंब बाहेर पडतात. यामुळे विविध प्रमाणात विषाणू पसरू शकतो. 'कित्येक मिनिटं हवेत राहू शकणारे मध्यम आकाराचे थेंब सर्वाधिक चिंताजनक आहेत. हवेच्या प्रवाहामुळे हे थेंब बऱ्यापैकी दूरवर पोहोचतात,' अशी माहिती संशोधकांनी दिली.जॉगिंग करताना मास्क वापरणं योग्य की अयोग्य? पाहा तज्ज्ञ काय सांगतायतजेव्हा लोक बोलतात, तेव्हा त्यांच्या तोंडातून थुंकीचे असंख्य थेंब बाहेर पडतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. हे थेंब आपल्याला सर्वसामान्यपणे दिसत नाहीत, असं अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबीटिज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिजीजेसच्या ऍड्रियन बेक्स यांनी सांगितलं. 'बोलताना तोंडातून निघत असलेल्या विषाणूयुक्त थेंबांतून जेव्हा पाणी वाफ होऊन निघतं, तेव्हा ते धुराप्रमाणे कित्येक मिनिटं हवेत तरंगू शकतं. त्यामुळे इतरांना असलेला धोका वाढतो,' असं बेक्स यांनी सांगितलं. घरात, बंद खोल्यांमध्ये होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. 'आपण घरांमध्ये जेवतो. त्यावेळी आपण एकमेकांशी संवाद साधतो. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. याच कारणामुळे रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफे यासारखी ठिकाणं कोरोना प्रसाराचं केंद्र ठरली होती,' अशी माहिती संशोधन अहवालाच्या लेखकांनी दिली. हा संशोधन अहवाल मंगळवारी 'इंटर्नल मेडिसिन'मध्ये प्रकाशित झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या