Delta Variant: चिंताजनक! डेल्टा व्हेरिअंटचे लस घेतलेल्यांनाही संक्रमण; AIIMS च्या अभ्यासात गंभीर बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 04:29 PM2021-06-09T16:29:50+5:302021-06-09T16:36:11+5:30

Delta Variant is infection Vaccinated people badly: कोरोना लस (corona vaccine) घेतली तरी देखील लोक कोरोना संक्रमित होत आहेत, यावर दिल्लीच्या एम्सने अभ्यास केला. यामध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली : एकीकडे अमेरिका, इस्त्राय़लने कोरोना लस घेतलेल्यांना मास्क न घालताच फिरण्याची मुभा दिली आहे. तर दुसरीकडे लस घेतलेल्यांनाच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा (Corona Delta varient) धोका सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. कोरोना लस (corona vaccine) घेतली तरी देखील लोक कोरोना संक्रमित होत आहेत, यावर दिल्लीच्या एम्सने अभ्यास केला. यामध्ये ही गंभीर बाब समोर आली आहे. (The 'delta' variant of COVID-19 - the version first detected in India in October last year - is capable of infecting people even after they have received both doses of the Covaxin or Covishield vaccines)

एम्सने केलेल्या पाहणीनुसार कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिअंट (B1.617.2) कोरोना लस घेतलेल्या लोकांना सर्वाधिक संक्रमित करत आहे. मग या लोकांनी कोव्हिशिल्ड घेतलेली असो, की कोव्हॅक्सिन, दोन्ही लसी घेतल्यानंतरही हा स्ट्रेन संक्रमण करण्यास सक्षम असल्याचे समोर आले आहे.

एम्सने आपल्या या अभ्यासामध्ये 63 लोकांना सहभागी केले होते. या लोकांना कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 36 असे लोक होते, ज्यांनी दोन्ही डोस घेतले होते. तर 27 लोकांनी एक डोस घेतला होता. या पैकी 10 लोकांना कोव्हिशिल्ड आणि उरलेल्या 52 लोकांना कोव्हॅक्सिन देण्यात आली होती.

एम्सने सांगितले की, 63 पैकी 41 पुरुष होते आणि 22 महिला होत्या. हे सर्व लस घेतल्यानंतर कोरोना बाधित झाले होते. मात्र, यापैकी एकाचाही मृत्यू झाला नाही. परंतू यापैकी अधिकतर लोकांना 5 ते 7 दिवसांहून अधिक काळ ताप होता.

लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांपैकी 60 टक्के लोकांमध्ये आणि एक डोस घेतलेल्या 77 टक्के लोकांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट मिळाला आहे. एम्सने दैनंदिन चाचण्यांमध्ये आलेल्या या रुग्णांच्या सॅम्पलचा अभ्यास केला.

या पैकी 10 लोकांना कोव्हिशिल्ड आणि उरलेल्या 52 लोकांना कोव्हॅक्सिन देण्यात आली होती.

या लोकांमध्ये खूप जास्त ताप, श्वास घेण्यास अडचण आणि डोकेदुखी सारखी समस्या दिसून आली आहे. या प्रकारामुळे एम्सचे डॉक्टरदेखील चिंतेत सापडले आहेत.

या लस घेतलेल्या बाधित लोकांमध्ये कोरोना व्हायरसचा व्हायरल लोड खूप जास्त होता. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये ही सारखीच परिस्थिती होती.

डेल्टा व्हायरस हा लसीची ताकद कमी करत असल्याचे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक अँड इंटीग्रेटिव बायोलॉजीने केलेल्या संशोधनात समोर आले होते.

त्यांच्या अभ्यासात हे देखील म्हटले गेले होते की, तरी देखील लस कोरोनाविरोधात खूप परिणामकारक आहे.