शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मास्क घातल्यावर श्वास गुदमरतो, दम लागतो? आता चिंता सोडा, लवकरच येणार ‘स्मार्ट फेस मास्क’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 05:19 IST

व्यायाम करताना, कष्टाची कामे करताना, धावपळीच्या वेळी या मास्कमुळे अनेकदा श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, गुदमरल्यासारखे होणे असे प्रकार होतात. मात्र, आता संशोधकांनी या उणिवांवर मात करणारा ‘स्मार्ट फेस मास्क’ बनविण्यात यश मिळविले आहे.

- प्रसाद ताम्हनकर (prasad.tamhankar@gmail.com)

‘अन्न, वस्त्र, निवारा’ या जोडीला आता ‘फेस मास्क’देखील अनिवार्य होऊ लागला आहे. सध्या ‘जीवनावश्यक’ या गटात मोडणारा हा मास्क वापरणे प्रत्येक वेळी आरामदायी असतेच असे नाही. व्यायाम करताना, कष्टाची कामे करताना, धावपळीच्या वेळी या मास्कमुळे अनेकदा श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, गुदमरल्यासारखे होणे असे प्रकार होतात. मात्र, आता संशोधकांनी या उणिवांवर मात करणारा ‘स्मार्ट फेस मास्क’ बनविण्यात यश मिळविले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड या फेस मास्कला देऊन त्याला एक ‘स्मार्ट फेस मास्क’ बनविण्यात आले आहे. हा फेस मास्क वापरकर्त्याच्या श्वास घेण्याच्या पद्धतीनुसार आणि आजूबाजूच्या प्रदूषित वातावरणाला अनुसरून स्वत:मध्ये योग्य ते बदल करू शकणार आहे.उदा. तुम्ही स्वच्छ वातावरणात, एकट्याने व्यायाम करीत असाल, तर अशावेळी तुम्हाला अत्यंत बारीक छिद्र असलेल्या मास्कची गरज नाही. अशावेळी संबंधित वातावरणाचा अंदाज घेऊन, हा मास्क आपल्या छिद्रांचा आकार थोडा मोठा करील, ज्यामुळे अधिक हवा या मास्कमधून आत शिरू शकेल आणि मास्क वापरणाऱ्याला श्वास घेणे अधिक सुलभ होईल. याउलट तुम्ही गर्दीच्या ठिकाणी अथवा एखाद्या प्रदूषित ठिकाणी असाल, तर त्याचा अभ्यास करून, हा मास्क त्याप्रमाणे आपल्या छिद्राच्या आकारात योग्य तो बदल करील. नॅनो फायबरपासून बनविण्यात आलेल्या या मास्कमध्ये, अत्यंत बारीक छिद्राचा एक डायनॅमिक एअर फिल्टर बसविण्यात आला आहे. या फिल्टरच्या चारी बाजूला ताण पडण्यासाठी खास ‘स्ट्रेचर’ लावण्यात आले आहे. हे स्ट्रेचर एका पोर्टेबल डिव्हाइसला कनेक्ट करण्यात आले असून, या डिव्हाइसमध्ये एक एअर पंप, सेन्सर आणि मायक्रोकंट्रोलर चीप बसविण्यात आली आहे. या फिल्टरवर ‘स्ट्रेचर’चा जोर पडल्यानंतर याची छिद्रे थोडी मोठी होतात, ज्यामुळे जास्तीची हवा सुलभपणे आत शिरते. ही छिद्रे मोठी झाली, तरी या फिल्टरच्या क्षमतेत फक्त ६ टक्के फरक पडतो. हा स्मार्ट फिल्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरच्या मदतीने संगणकाशी जोडता येऊ शकतो. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा हवेतील प्रदूषित कण व इतर पदार्थांचा अभ्यास करते आणि मास्कला योग्य त्या सूचना पोहोचविल्या जातात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या