संशयाच्या कचाट्यात सापडलेली रशियाची लस जगाचा विश्वास जिंकणार; उचललं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:10 PM2020-08-21T19:10:00+5:302020-08-21T19:11:46+5:30

CoronaVirus News & Latest Updates : सुरुवातीपासूनच Sputnik V ही लस सुरक्षित असल्याचा आणि चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यातून गेल्याचा  दावा रशियानं केला आहे. 

CoronaVirus News : Russia coronavirus vaccine trials 40000 people | संशयाच्या कचाट्यात सापडलेली रशियाची लस जगाचा विश्वास जिंकणार; उचललं मोठं पाऊल

संशयाच्या कचाट्यात सापडलेली रशियाची लस जगाचा विश्वास जिंकणार; उचललं मोठं पाऊल

Next

सगळ्यात आधी यशस्वीरित्या लस तयार करणारी रशियाा जगभराचा विश्वास जिंकू शकते. रशियाच्या लसीची चाचणी करण्यासाठी आता तब्बल ४० हजार लोकांवर परिक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे परिक्षण पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. याआधीही Fontanka न्यूज एजेंसीनं दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या आरोग्यमंत्रालयानं ३८ लोकांवर चाचणी केल्यानंतर मंजूरी दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच कोरोनाची लस लॉन्च केल्यामुळे जगभरातील तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटना संशयाच्या नजरेनं पाहत होती. सुरुवातीपासूनच Sputnik V ही लस सुरक्षित असल्याचा आणि चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यातून गेल्याचा  दावा रशियानं केला आहे. 

रशियाची लस तयार केलेल्या मॉस्कोच्या गमलेया इंस्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ४५ आरोग्यकेंद्रांवर ४० हजार लोकांना सहभागी करून कोरोना लसीची चाचणी केली जाणार आहे. रशियाच्या लसीला आर्थिक मदत पुरवणारी संस्था रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (RDIF) चे प्रमुख किरिल दमित्रीव यांनी सांगितले की, अनेक देश रशियाच्या लसीविरुद्ध  भूमिका मांडत आहेत.  तसंच या लसीबाबत माहिती  यात महिन्यात प्रकाशित करण्यात येणार आहे. या लसीला  जागतिक आरोग्य संघटनेनं अद्याप मंजूरी दिलेली नाही. 

या लसीच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी खूप  जलद गतीने झाली होती. जवळपास दोन महिन्यांच्या आत दोन्ही टप्प्यातील ट्रायल पूर्ण करण्यात आलं होतं. स्पूतनिक न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार लसीच्या उत्पादनाचा एक व्हिडीओ सुद्धा तयार करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती आणि गमालेया इंस्टिट्यूनं  ही लस प्रभावी ठरत असल्याचे सांगितले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस विकसित करण्यात आली आहे. 

भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता

रशियाने तयार केलेली कोरोनावरील लस स्पूतनिक व्ही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेक भारतीय कंपन्या सरसावल्या आहेत. भारतीय कंपन्यांनी रशियन संचालक गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) यांच्यकडे  लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांविषयी माहिती देण्यास सांगितले आहे.
आरडीआयएफ रशियाची भांडवल पुरवठा करणारी कंपनी आहे.

याच कंपनीने कोरोना लस स्पूतनिक व्हीचे संशोधन आणि चाचणीसाठी वित्तसहाय्य केले आहे. आरडीआयएफला ही लस वितरण व निर्यात करण्याचा अधिकार आहे. ही लस जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस आहे. जर आरडीआयएफसोबत भारतीय कंपन्यांची चर्चा सुरुच राहिली तर लस भारतात तयार होऊ शकते. ही लस निर्यात आणि देशात वापरली जाऊ शकते. मॉस्को येथील भारतीय दूतावासाच्या सूत्रांनी रशियन वृत्तसंस्था स्पूतनिकला ही माहिती दिली होती.

रशियन दूतावासातील सूत्रांनी सांगितले की, "भारतीय कंपन्या लस संदर्भात आरडीआयएफशी संपर्क साधत होते आणि या कंपन्यांनी फेज -१ आणि फेज -२ चाचणीसाठी तांत्रिक माहिती मागविली होती. या कालावधीत सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर तिसर्‍या देशाला लसीच्या निर्यातीवर चर्चा झाली. याशिवाय, देशातील वापरासाठी लस निर्मितीवरही चर्चा झाली होती."

रशिया कोरोनाविरूद्ध लस रजिस्टर करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ही लस रशियाच्या मायक्रो बायोलॉजी रिसर्च सेंटर गमलयाने विकसित केली आहे. ही लस बुधवारी क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात गेली आहे. रशियामध्ये भारताचे राजदूत वेंकटेश वर्मा यांनी वृत्तसंस्था स्पूतनिकला सांगितले की, लस निर्मितीसंदर्भात आरडीआयएफ प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच, यासंदर्भात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा-

खुशखबर! ८० टक्के कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतरांना संसर्गाचा धोका नाही, संशोधनातून खुलासा

निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

Web Title: CoronaVirus News : Russia coronavirus vaccine trials 40000 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.