शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

CoronaVirus News: जाणून घ्या; बाजारात आतापर्यंत आलेली 7 नवी औषधे आणि उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:25 IST

त्याच पार्श्वभूमीवर कोरोनावर रामबाण ठरणारी काही औषधं समोर आली आहेत. त्याच औषधांसंदर्भात आम्ही माहिती देत आहोत. 

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रुग्णसंख्याही वाढत आहे. जगभरात कोरोनाचा फैलाव झाला असल्यानं अनेक देश कोरोनावर लस बनवणं आणि औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनावर रामबाण ठरणारी काही औषधं समोर आली आहेत. त्याच औषधांसंदर्भात आम्ही माहिती देत आहोत. 

>रेमडिसिव्हिरऔषधाचा प्रकार : विषाणूरोधक प्रतिजैविकभारतातील स्थिती : औषधाला मिळाली मान्यताहे माणसाच्या शरीरात विषाणूंची होणारी संख्यावाढ रोखून प्रकृती सुधारण्यास मदत करते. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना रेमडिसिव्हिर दिल्यानंतर त्यांची प्रकृती बरी होऊन सरासरी ११ दिवसांतच घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.औषध कधी द्यावे : ज्या कोरोनाच्या रुग्णाला आॅक्सिजनवर ठेवले असेल वा तापाचे प्रमाण माफक असेल अशा रुग्णाला हे औषध द्यावे. औषध कसे द्यावे : अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला शिरेच्या वाटेने इंजेक्शनच्या माध्यमातून रेमडिसिव्हिर द्यावे. इनहेलर स्वरूपात हे औषध देण्यासाठी गिलिड सायन्सेस या कंपनी सध्या संशोधन करत आहे.>ग्लुकोकोर्टिकॉइड्सऔषधाचा प्रकार : कोर्टिकोस्टिरॉइडभारतातील स्थिती : औषधाला मिळाली मान्यताशरीरामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची गती व इफ्लेमेटरी केमिकल्सचे प्रमाण हे औषध कमी करते.औषध कधी देतात : प्रकृती चिंताजनक असलेल्या तसेच शरीरातील आॅक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णांना हे औषध द्यावे.औषध कसे देतात : शिरेच्या वाटेने हे औषध दिले जाते.>डेक्सामिथेसॉनऔषधाचा प्रकार : कोर्टिकोस्टिरॉइडभारतातील स्थिती : कोरोना संसर्गावरील उपचारांसाठी वापरण्यास मान्यता मिळालेली नाही. मात्र रूमटॉइड आथ्रायटिस, अ‍ॅलर्जीवर हे औषध दिले जाते.फुप्फुसाला झालेली हानी भरून काढते. तसेच श्वसनप्रक्रियेत निर्माण झालेली गुंतागुंत या औषधाने बरी होते व रुग्णाचे प्राण वाचू शकतात.औषध कधी देतात : व्हेंटिलेटरवर असलेल्या तसेच प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांनाच हे औषध द्यावे. कमी प्रमाणात ताप किंवा आजार असेल तर हे औषध देऊ नये.औषध कसे दिले जाते : अतिदक्षता विभागात शिरेच्या वाटेने हे औषध द्यावे. प्रकृती खूप चिंताजनक नसलेल्या रुग्णांना या औषधाची गोळी दिली जाते.>फेविपिराव्हिरऔषधाचा प्रकार : विषाणूरोधक प्रतिजैविकभारतातील स्थिती : या औषधाच्या वापरास मिळाली मान्यता. कोरोनाच्या विषाणूंची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या आरएनए पॉलिमरिजना निष्प्रभ करण्याचे काम हे औषध करते.औषध कधी देतात : संसर्गामुळे कमी किंवा अधिक प्रमाणात ताप आलेला असताना हे औषध द्यावे.औषध कसे देतात : गोळीच्या स्वरूपात द्यावे.>टॉसिलिझुमाबऔषधाचा प्रकार : मोनोसिओनल अँटिबॉडीभारतातील स्थिती : या औषधास मान्यता.असे गुणकारी ठरते : शरीरातील प्रतिकारशक्ती नेहमीपेक्षा अधिक वेगाने काम करू पाहाते. त्यावर नियंत्रण राखण्याचे काम हे औषध करते.औषध कधी देतात : नुकताच आजारी पडलेला रुग्ण किंवा ज्याची प्रकृती चिंताजनक आहे अशा रुग्णालाही हे औषध देता येते.औषध कसे देतात : शिरेवाटे.>कॉन्व्हालेसेन्ट प्लाझ्माऔषधाचा प्रकार : प्लाझ्मा थेरपीभारतातील स्थिती : मर्यादित वापरास मान्यता.असे गुणकारी ठरते : या थेरपीत संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडिज उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या शरीरात टोचल्याने प्रतिकारशक्ती वाढते.औषध कधी दिले जाते : स्टेरॉइड देऊनही ज्या रुग्णांना आॅक्सिजनची पातळी आणखी वाढवावी लागत असेल त्यांना हे औषध द्यावे.औषध कसे देतात : ट्रान्सफ्यूजन>हायड्रॉक्सिक्लोरोक्विनऔषधाचा प्रकार : मलेरिया प्रतिबंधक औषधभारतातील स्थिती : वापरास मिळाली मान्यता.असे गुणकारी ठरते : माणसाच्या पेशीतील एन्झाइमचे प्रमाण कमी करून हे औषध कोरोना विषाणूला पेशीत शिरण्यापासून रोखते. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग होत नाही.औषध कधी दिले जाते : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्स व अन्य आरोग्यसेवक, बंदोबस्ताला असलेले पोलीस, कोरोनाग्रस्त भागात तैनात असलेले लष्करी, निमलष्करी दलाचे जवान यांना हे औषध देतात. तसेच कोरोना संसर्ग झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत त्या रुग्णाला हे औषध देण्यास हरकत नसते. मात्र प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला हे औषध देऊ नये.औषध कसे देतात : गोळ््यांच्या रुपाने तोंडावाटे द्यावे.(ही औषधे डॉक्टरांनी देणे अपेक्षित आहे. कोणीही स्वत:हून ही औषधे मिळवू वा घेऊ नयेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या