शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांसाठी रेमडिसिव्हिर ठरेल गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 02:54 IST

CoronaVirus News :कोरोनावरील उपचारांत हे औषध गेम चेंजर ठरणार असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गावरील उपचारांत रेमडिसिव्हिर या औषधाचा वापर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. हे औषध लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे हेटेरो या कंपनीने म्हटले आहे. कोरोनावरील उपचारांत हे औषध गेम चेंजर ठरणार असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी फेविपिराविर या औषधाची जेनेरिक आवृत्ती भारतात उपलब्ध करून देण्यास ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. ग्लेनमार्कने फॅबिफ्लू या नावाने हे औषध बाजारात आणले आहे.रेमडिसिव्हिर औषधासंदर्भात हेटेरो या उत्पादक कंपनीने म्हटले आहे की, कोरोना आजारामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांना रेमडिसिव्हिर आता देता येईल. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावरील उपचारांत रेमडिसिव्हिर सामील केल्याने हे रुग्ण लवकर बरे होण्यास मोठी मदत मिळणार आहे.कोविफॉर हे औषध १०० मिलिग्रॅम इंजेक्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. या औषधासाठी हेटेरो कंपनीने अमेरिकेच्या गिलियड सायन्सेस या कंपनीसोबत करार केला आहे. भारतामध्ये या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येईल असे या कंपनीतर्फे सांगण्यात आले.>कोरोना विषाणूच्या संसर्गाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर फॅबिफ्लू औषधाचा चांगला परिणाम होत असल्याचे त्याबद्दलच्या चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. हे औषधही देशभरात उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादक कंपनी केंद्र सरकारशी चर्चा करत आहे. फॅबिफ्लूच्या प्रत्येक गोळीची किंमत १०३ रुपये असणार असल्याचेही सांगण्यात आले. कोरोनावर प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. जो देश ही प्रतिबंधक लस तयार करण्यात यश मिळवेल, त्याने ती लस जगभरातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना वाजवी किमतीत उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या