शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

लढ्याला यश! भारतात कोरोनाची 2 सर्वात स्वस्त औषधं आली; एक टॅब्लेट 55 रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 14:41 IST

CoronaVirus News & Latest Updates : एफडीसी लिमिटेड कंपनीनं कोविड 19 च्या फेविपीरावीर या औषधाचे दोन वेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यातील एका औषधांचे नाव पीएफएफएलयू आणि फेविंजिया आहे.

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि औषध तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर करून कोरोना रुग्णांचे उपचार केले जात आहेत. दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. एफडीसी लिमिटेड कंपनीनं कोविड 19 च्या फेविपीरावीर या औषधाचे दोन वेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यातील एका औषधांचे नाव पीएफएफएलयू आणि फेविंजिया आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार एफडीसीनं दिलेल्या माहितीनुसार ड्रग कंट्रोल ऑफ इंडीया डीजीसीआयनं फेविपीरावीरच्या वापराला मंजूरी दिली आहे. हे एक ओरल एंटीव्हायरल औषध आहे. कोरोना व्हायरसची हलकी, मध्यम आणि सौम्य स्वरुपातील लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी ठरलं आहे.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात हे औषध संपूर्ण भारतभरात हे औषध उपलब्ध होणार आहे. या औषधाच्या एक टॅबलेटची किंमत 55 रुपये इतकी आहे. एफडीसीचे मुख्य प्रवक्ता मयंक टिख्का यांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषध लॉन्च झाल्यामुळे कोरोना रुग्णांची स्थितीत गंभीर होण्यापासून वाचवता येऊ शकतं.  सरकार आणि आरोग्य सेवेतील तज्ज्ञांसोबत मिळून या औषधाचे उत्पादन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 32 लाखांच्या वर गेला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

याच दरम्यान कोरोनाचा धक्कादायक ग्राफ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांत देशात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाला जवळपास 1000 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. देशातील रुग्णसंख्या रोज नवा उच्चांक गाठत असून 32 लाखांचा टप्पा आता पार केला आहे.

 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे अनेक नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 लाख 34 हजार 475 वर पोहोचली असून कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 59,449 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 7,07,267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 24,67,759 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हे पण वाचा-

युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार? 

स्तनाच्या कर्करोगाचा उपचार कालावधी केवळ तीन महिने; टाटा रुग्णालयाचा अभ्यास अहवाल

टॅग्स :Healthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या