शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाच्या हल्ल्यामुळे कमकुवत झालेली फुप्फुसे बरी होण्यास लागतो एवढा काळ, संशोधनातून समोर आली दिलासादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:59 IST

Coronavirus News: कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात प्रवेश करणारा कोरोना विषाणू हा सर्वात मोठा हल्ला करतो तो रुग्णाच्या फुप्फुसांवर. फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊन रुग्ण मृत्यूच्या दारात पोहोचतो.

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात प्रवेश करणारा कोरोना विषाणू हा सर्वात मोठा हल्ला करतो तो रुग्णाच्या फुप्फुसांवर. फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊन रुग्ण मृत्यूच्या दारात पोहोचतो. (Coronavirus) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, अनेक कोरोनाबाधित रुग्णांची फुप्फुसे ही ९० टक्क्यांपर्यंत खराब झाल्याचे दिसून आले होते. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित फुप्फुसांमध्ये लंग्स फायब्रोसिस नावाचा आजार फैलावू शकतो अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. अशा आजारामध्ये फुप्फुसांमधील टिश्शू खराब होऊन फुप्फुसे काम करणे बंद करतात. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ज्या रुग्णांची फुप्फुसे खराब झाली होती, ती तीन महिन्यांमध्ये बरी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. (Lungs weakened by the corona virus attack heal in three months )

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सुमित सिंघानिया यांनी सांगितले की, अभ्यासामधून समोर आले आहे की, बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांची फुप्फुसे ही आता बरी होत आहेत. या अभ्यासाचे प्राथमिक निष्कर्ष हे लंग्स इंडिजा जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. 

डॉ. सुमित सिंघानिया यांनी सांगितले की, ज्या कोरोनाबाधित रुग्णांची फुप्फुसे खूपच खराब झाली होती, अशा रुग्णांचे निरीक्षण करून या संशोधनामधील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तीन महिन्यांनंतर बहुतांश रुग्णांच्या फुप्फुसांचे आकार आणि काम करण्याची पद्धत खूप सुधारली आहे. सर्व रुग्णांचे लंग्स फंक्शन टेस्ट आणि सीटीस्कॅन करण्यात आले आहेत.

हे संशोधन कोरोनाच्या त्या ४२ रुग्णांवर करण्यात आले आहे. ज्यांना अँटिव्हायरल रेमडेसिविर इंजेक्शन आणि स्टेरॉइड देण्यात आले होते. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना धोकादायक पातळीवरचा निमोनिया झाला होता. आतापर्यंत या संशोधनांतर्गत ३०० जणांवर लक्ष ठेवण्यात आला आहे. काही लोकांचे कोरोना झाल्यानंतर एक वर्षानंतरही फॉलो करण्यात आले आहे. तर दुसरीकडे हिंदुजा रुग्णालयाशी संबंधित एका डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांना लंग्स फायब्रोसिसचे औषधही घेण्यास सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य