शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus: ‘आरोग्य संदेश’ मिठाई वाढवणार रोगप्रतिकारशक्ती; कोरोना विषाणूशी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 10:51 IST

कोरोनाला दूर ठेवणार दूध : गुणकारी मध, तुळशीचा होणार प्रभावी वापर

कोलकाता : कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अत्यंत गुणकारी अशा मधाचा वापर केला जाणार आहे. बंगाल टायगरसाठी प्रसिद्ध असलेल्या सुंदरबनातील मध वापरून कोरोनाला दूर ठेवू शकणारी ‘आरोग्य संदेश’ मिठाई तयार करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार सज्ज आहे.

मधाला आयुर्वेदामध्ये मोठे महत्त्व आहे. मध हा रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी गुणकारी असतो. याच गुणधर्माचा वापर करून बंगाल सरकार ‘आरोग्य संदेश’ हे इम्युनिटी बुस्टर बाजारात आणणार आहे. दुधापासून बनविलेल्या चीजमध्ये सुंदरबनातील मध आणि तुळशीच्या पानांचा रस मिसळून ही मिठाई तयार करणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.महत्त्वाचे म्हणजे, ‘आरोग्य संदेश’मध्ये स्वीट मार्टमधील अन्य मिठायांसारखा कोणत्याही प्रकारचा कृत्रिम स्वाद नसेल. ही मिठाई रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लाभदायक ठरेल, पण तिच्याकडे औषध म्हणून पाहू नये, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सुंदरबनचे मंत्री मंटुराम पाखिरा यांनी सांगितले की, संदेश मिठाईसाठी वापरण्यात येणारा मध हा सुंदरबनमधील पिर्खली, झार्खली आणि अन्य भागातून गोळा केला जाणार आहे. हा मध वैज्ञानिक पद्धतीने साठविला जाणार आहे.

विश्वासार्ह इम्युनिटी बूस्टर!‘आरोग्य संदेश’ पुढील दोन महिन्यांमध्ये बाजारात येणार असून, याची किंमतही सामान्य माणसांना परवडेल अशी ठेवण्यात येणार आहे. याआधी कोलकाता येथील मिठाई विक्रेत्यांच्या एका प्रतिष्ठित संघटनेने ‘इम्युनिटी संदेश’ नावाची मिठाई बाजारात आणली होती. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक सत्त्व असल्याचा दावा त्यांनी केला होता. यामध्ये हळद, तुळस, केशर, वेलची आणि मध असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता सरकारनेच ‘आरोग्य संदेश’ची भेट देण्याचे ठरवल्यामुळे नागरिकांना विश्वासार्ह इम्युनिटी बूस्टर मिळू शकेल, अशी आशा व्यक्त होतेय.

कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. अशातच बाजारात सध्या ही खास मिठाई आणण्यात येणार आहे. कोरोनाशी लढण्यासाठी खास मिठाई मदत करणार असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामधील एका मिठाई विक्रेत्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल अशी मिठाई काही दिवसांपूर्वी तयार केली होती. 11 हर्ब्सपासून 'संदेश' नावाची खास मिठाई तयार करण्यात आली. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा दावा मिठाई विक्रेत्याने केला होता. 

लोकांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं हे या काळात अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच अशा पद्धतीची मिठाई तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संदेश मिठाईत तुळस, हळद, वेलची, जायफळ, आलं, काळी मिरी, जिरं, तमालपत्र अशा हर्ब्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये साखर किंवा गूळ वापरलेला नाही. तर मधाचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून मिठाईत वापरलेल्या हर्ब्समधील पोषक घटक कायम राहतील. संदेश मिठाईही मिष्टी दही, रसगुल्ल्याप्रमाणेच प्रसिद्ध अशी बंगाली मिठाई आहे. 

(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवाप्रभाव नाही.) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याwest bengalपश्चिम बंगाल