शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ...तर डेल्टा ठरतो लसीवरही भारी; केवळ एक डोस ठरत नाही परिणामकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 06:24 IST

Coronavirus : सध्या डेल्टा प्लसनं डोकं काढलंय वर. डेल्टा व्हेरिएंट कोरोनाप्रतिबंधक लसीच्या एका डोसने नियंत्रणात येत नसल्याचे आढळून आले आहे. 

ठळक मुद्देसध्या डेल्टा प्लसनं डोकं काढलंय वर. डेल्टा व्हेरिएंट कोरोनाप्रतिबंधक लसीच्या एका डोसने नियंत्रणात येत नसल्याचे आढळून आले आहे. 

कोरोनाची दुसरी लाट अजून तरी पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या डेल्टानामक व्हेरिएंटची पुढची पायरी डेल्टा प्लस विषाणू आहे. डेल्टा व्हेरिएंट कोरोनाप्रतिबंधक लसीच्या एका डोसने नियंत्रणात येत नसल्याचे आढळून आले आहे. 

काय आढळले संशोधनात?ॲस्ट्राझेनेका आणि फायझर-बायोएन्टेक या लसींचे डोस घेणाऱ्यांवर डेल्टासाठी संशोधन करण्यात आले. या लसींचे प्रत्येक एक डोस दिले असता ते डेल्टाला निष्प्रभ करू शकले नाहीत. मात्र, लसीच्या दोन डोसमुळे डेल्टावर परिणाम झाल्याचे संशोधनात आढळून आले. 

पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी यावर अभ्यास केला असून त्यासंदर्भातील अहवाल नेचर या मासिकात प्रकाशित झाला आहे. दोन्ही डोसमुळे प्रतिकारशक्ती वाढीस लागते आणि अँटिबॉडीज मोठ्या प्रमाणात तयार होतात. 

डेल्टा व्हेरिएंट अनेक देशांत सक्रियभारतात दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेला डेल्टा व्हेरिएंट अमेरिकेसह ९८ देशांमध्ये पसरलेला आहे. अमेरिका, मलेशिया, पोर्तुगाल, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये त्याचा फैलाव अधिक आहे.वर्षाच्या सुरुवातील युरोप आणि ब्रिटनमध्ये डेल्टाचे हजारो संक्रमित सापडले होते. सद्य:स्थितीत डेल्टा व्हेरिएंटने अमेरिकेची चिंता वाढवली आहे. भारतात हा व्हेरिएंट प्रथम गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आढळून आला आणि मे २०२१ मध्ये तो धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला.

डेल्टासाठी विशेष लसडेल्टा व्हेरिएंटविरोधात फायझर आणि बायोएन्टेक विशेष लसीची निर्मिती करत आहेत. ऑगस्टपासून दोन्ही कंपन्या या विशेष लसीसाठी नैदानिक चाचण्या सुरू करणार आहेत. त्याचबरोबर बूस्टर डोसची निर्मितीही या कंपन्या करणार आहेत.  पुढील दोन ते तीन आठवड्यांत बूस्टर डोससंदर्भातील अहवाल दोन्ही कंपन्या अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे सोपविणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसParisपॅरिसEnglandइंग्लंडAmericaअमेरिकाResearchसंशोधन