शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी कुत्रे मदत करणार, जाणून घ्या कसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:51 IST

काही रिसर्चकर्त्यांनी कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी कुत्र्याचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी औषधं, लस, शोधण्यासाठी वेगवेगळ्या देशात रिसर्च केला जात आहे. कारण कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊन मृत्यू होत असलेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या दरम्यान काही रिसर्चकर्त्यांनी कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी कुत्र्याचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.  कुत्र्यांचा वापर नेमका कशा पध्दतीने केला जाणार आहे. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

माणसांच्या तुलनेत कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता १० हजार पटीने जास्त असते. इतकंच नाही तर ड्रग्स आणि स्फोटकं शोधून काढण्यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणेद्वारे कुत्र्यांचा वापर केला जातो. लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसीनद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार कुत्रा श्वासांशी निगडीत आजारांना सहतेने ओळखू शकतो.

मलेरिया सारख्या आजारांना श्वासांद्वारे ओळखण्याची क्षमता कुत्र्यांमध्ये असते. याबाबतीत माहिती मिळाल्यानंतर ब्रिटेनच्या चेरिटेबल संस्थेचे शास्त्रज्ञ मिळून कुत्रा कोरोना व्हायरसचा शोध घेण्यासाठी उपयोगी ठरू शकतो का, याचा शोध घेत आहेत. त्यासाठी कुत्र्यांना  खास ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सरू असल्याचे संशोधक म्हणाले.

लंडन स्कूल ऑफ हायजीन आणि ट्रॉपिकल मेडिसीनच्या रोग नियंत्रण विभागाच्या मते कुत्र्यामध्ये मलेरियाचा रुग्ण ओळखण्याची क्षमता असते. तसंच श्वासांचे इतर आजार सुद्धा कुत्रा शोधून काढण्यासाठी कुत्र्याची मदत होऊ शकते. या कारणांमुळे कुत्रा कोरोना व्हायरसचा तपास करण्यासाठी मदतशीर ठरेल अशी आशा संशोधकांना आहे.

शास्त्रज्ञांच्यामते कुत्र्यांना कॅन्सर आणि पार्किंसंस यांसारख्या आजारांचे सुरूवातीची लक्षणं ओळखण्यासाठी प्रक्षिक्षण दिलं जात आहे. मेडिकल डिटेक्शन डॉग्स स्कूलने कोरोना व्हायरसला हरवण्याासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी कोणत्याही रोगाच्या एका विशिष्ट वासाला सुरक्षित स्वरुपात ओळखून कुत्र्यासमोर द्यायला हवं. असं त्यांचं म्हणणं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स