शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना संक्रमित लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांबाबत धक्कादायक स्टडी; रक्तगट A, B आणि RH+ ला सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 19:43 IST

Coronavirus : या स्टडीत हे देखील समोर आले आहे की, रक्तगटांची आणि रोगांची गंभीरता तसेच मृत्यूदरासाठी संवेदनशीलता यांच्यात कोणताही संबंध नाही.

Blood Group Study on COVID-19 : कोरोना संक्रमित लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांबाबत धक्कादायक स्टडी समोर आली आहे.  A, B आणि Rh+ रक्तगटाचे लोक कोरोना संसर्गसाठी अतिसंवेदनशील असतात. तर O, AB आणि RH+ रक्तगटाचे लोक कोरोना संसर्गास कमी संवेदनशील असतात, असे या स्टडीतून उघड झाले आहे.

याचबरोबर, या स्टडीत हे देखील समोर आले आहे की, रक्तगटांची आणि रोगांची गंभीरता तसेच मृत्यूदरासाठी संवेदनशीलता यांच्यात कोणताही संबंध नाही. ही स्टडी "फ्रंटियर्स इन सेल्युलर अँड इन्फेक्शन मायक्रोबायोलॉजी" च्या 21 नोव्हेंबरच्या आवृत्तीत प्रकाशित झाली आहे. ही स्टडी राजधानी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या डिपार्टमेंट ऑफ रिसर्च ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन मेडिसनने केली आहे.

गंगाराम हॉस्पिटलच्या डॉ. रश्मी राणा यांनी सांगितले की, सीव्हियर एक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा कोरोना व्हायरस 2 चा एक नवीन व्हायरस आहे. रक्तगटाचा कोरोना जोखीम किंवा प्रगतीवर काही परिणाम होतो की नाही, म्हणून या स्टडीत आम्ही  A, B, O आणि RH रक्तगटांसह कोरोनाची संवेदनशीलता, याचे निदान आणि बरे होण्यासाठी लागणारा वेळ आणि मृत्यूचे प्रमाण तपासले. ही स्टडी 2,586 कोरोना बाधित रुग्णांवर करण्यात आली. ज्यांना 8 एप्रिल 2020 ते 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसरीकडे, डॉ. विवेक रंजन म्हणाले की, B + पुरुष रुग्णांना महिला रुग्णांपेक्षा कोरोनाची शक्यता जास्त असते. रक्तगट B आणि AB ला 60 वर्षे वयाच्या रुग्णांमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले. तसेच, आमच्या स्टडी असेही आढळून आले आहे की, रक्तगट A आणि RH+ च्या रुग्णांमध्ये बरे होण्याचा कालावधी कमी आढळला होता, तर O आणि RH- रक्तगटाच्या रुग्णांमध्ये बरे होण्याचा कालावधी वाढला होता, असे डॉ. विवेक रंजन यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य