शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही चिंता नाही; नव्या रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 08:19 IST

लसीकरणानंतर रुग्णालयवारी क्वचितच, अभ्यासासाठी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलतर्फे ३,२३५ आरोग्य कर्मचाऱ्यांची पाहणी करण्यात आली. लसीकरणानंतरच्या १०० दिवसांत कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले

लसीकरण झाले तरी कोरोना होऊन रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने ही पाहणी केली..

किती लोकांची पाहणी करण्यात आली

अभ्यासासाठी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलतर्फे ३,२३५ आरोग्य कर्मचाऱ्यांची पाहणी करण्यात आली. लसीकरणानंतरच्या १०० दिवसांत कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.अभ्यास कालावधीत ८५ आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.

किती लोकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले

हॉस्पिटलतर्फे करण्यात आलेल्या पाहणीत कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्यांपैकी केवळ ०.०६ टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे आढळून आले. कोरोनाची लागण झालेल्या ८५ कर्मचाऱ्यांपैकी ६५ जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या होत्या तर उर्वरितांना एकच मात्रा मिळाली होती. त्यातही बाधितांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते.

रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्येही फार गुंतागुंत निर्माण झाली नाही. त्यांचा कोरोना सहज बरा होणारा असल्याचेही स्पष्ट झाले.लसीकरण मोहीम संपूर्ण झाली तरी कोरोना होण्याचे प्रमाण शून्यावर येईल, असे नाही. लसीकरणानंतरही कोरोना झाला तरी त्यात रुग्णाची प्रकृती गंभीर वा अत्यवस्थ होण्याची शक्यता अजिबात नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी होण्याची हमी आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी घेतलेल्यांची पाहणी या अभ्यासात करण्यात आली होती.९७.३८ टक्के लोकांचे लसीकरणामुळे कोरोनापासून रक्षण झाल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.या पाहणीतून असे निश्चित झाले की कोरोनाप्रतिबंधक लसी १०० टक्के प्रतिकारशक्ती निर्माण करत नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या