शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine News : धक्कादायक! AstraZeneca ची लस घेतल्यानंतर तयार झाल्या रक्ताच्या गाठी; तब्बल ७ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 17:57 IST

CoronaVaccine News : लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर ने दिली आहे.

कोरोनाची लस आल्यानंतर लोकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झालं होतं.  पण लसीचे साईड इफेक्ट्स काही प्रमाणात दिसून आल्यामुळे लस घ्यायची  की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. दरम्यान एक्स्ट्राजेनका लसीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्रिटनमध्ये  Oxford-AstraZeneca  कोरोना लस घेतल्यानंतर सात जणांना आपला जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. ही लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही माहिती ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटर ने दिली आहे.

युरोपातील अन्य काही देशांमधून एक्स्ट्राजेनकाच्या लसीबाबत तक्रारी  येत होत्या. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी जगभरातील देशांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) लस वापरणे सुरू ठेवण्याची शिफारस केली. लसीबाबत अनेकांच्या मनात  साशंकता असल्यामुळे लसीच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष देत आहोत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं.  

दरम्यान जागतिक आरोग्य संघटना युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि AstraZeneca यांनी ही लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गुठळ्या किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा पुरावा मिळाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. WHO ने देखील AstraZeneca  सांगितलं होतं की, लस आणि रक्ताच्या गुठळ्या याचा कोणताही संबंध असलेली एकही रुग्ण आढळलेला  नाही. आता या देशात लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची तक्रार केली आहे.

काही युरोपियन देशांनी या आधीच एक्स्ट्राजेनका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसित केलेल्या कोविड 19 लसीच्या वापरावर काही प्रमाणात बंदी घातली होती. ही लस घेतल्यानंतर डेन्मार्कमधील एका ६० वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. आता एक्स्ट्राजेनकाची लस घेतल्याने ७ जणांचा मृत्यू झाल्याचं स्वत: ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटरने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लसीवरच्या वाापरावर बंदी घालण्यात येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

लसीकरणानंतर दिसणारे साईड इफेक्ट्स

सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार हात पाय थरथरणं, थकवा, उलटी, ताप, सुज आणि वेदना, कोरोना लसीचे अनेक साईड इफेक्ट्स आहेत. काही लोकांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर वेदना आणि सुजेचा अनुभव केला आहे.  जास्तीत जास्त लोकांना त्वचा  लाल होणं,  खाज येणं. या समस्यांचा सामना करावा लागला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर काहीवेळ आराम करायला हवा. जेणेकरून लकरात लवकर रिकव्हर होत येईल.  

महिलांमध्ये दिसणारे साईड इफेक्ट्स जास्त

एका नव्या संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा स्त्रियांना लसीचे दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असतो. याची पडताळणी करण्यासाठी, रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रनं (सीडीसी) केलेल्या अभ्यासानुसार वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना लस देण्यात आल्या. एकूण लस घेतलेल्या महिलांचे दुष्परिणाम 79. टक्के होते.

कोविड शॉट घेतलेल्या 44 टक्के  स्त्रिया अशा होत्या. ज्यांनी अ‍ॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान या  महिलांना फाइझर लसीचे शॉट्स देण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ही लस महिलांच्या शरीरात पोहोचते आणि काम करण्यास प्रारंभ करते तेव्हा महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वेगाने प्रतिसाद देते ज्यामुळे त्यांना लवकर दुष्परिणाम होतात. CoronaVaccine News: लस घेतल्यानंतरही लोक येताहेत कोरोना पॉझिटिव्ह?; समोर आलं खरं कारण

एकदा कोरोना झालेल्या लोकांवर दुष्परिणाम जास्त

झीओओवर (कोविड सिमेंटम अॅप)  आधारित अभ्यासावनुसार फाइजर शॉट्स मिळवलेल्यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश लोकांना पूर्वी कोविड होता. ते म्हणाले की ही लस दिल्यावर थंडी वाजण्यासह संपूर्ण शरीरावर परिणाम त्यांच्यावर झाला. ज्यांना पूर्वी कोविड झाला नव्हता ते लसीकरणानंतरही पूर्णपणे सामान्य होते. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस