शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Corona Virus: कोरोनाची नवी लाट कधी येणार? राष्ट्रीय टास्क फोर्सच्या अधिकाऱ्याने दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 16:10 IST

या व्हायरसची पुढची लाट ६ ते ८ महिन्यांमध्ये येऊ शकते. यासोबतच त्यांनी असाही दावा केला आहे की जरी ओमायक्रॉनचा सब -व्हेरिएंट BA.2, BA.1 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असला तरी तो संभाव्य आगामी लाटेचं कारण ठरणार नाही.

कोविड-19 टास्क (Covid-19 Task Force) फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी म्हटलं की जर कोरोनाचा नवा व्हेरिएंट (New Variant of Coronavirus) आला तर या व्हायरसची पुढची लाट ६ ते ८ महिन्यांमध्ये येऊ शकते. यासोबतच त्यांनी असाही दावा केला आहे की जरी ओमायक्रॉनचा सब -व्हेरिएंट BA.2, BA.1 च्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असला तरी तो संभाव्य आगामी लाटेचं कारण ठरणार नाही (New Wave of Coronavirus).

ते पुढे म्हणाले, की तेव्हार्यंत आपण ओमायक्रॉनच्या शेवटच्या टप्प्यात असू. मात्र आपण हेदेखील लक्षात ठेवायला हवं की हा विषाणू आपल्या आसपासच असून त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक शक्य असलेला प्रयत्न करायला हवा. ओमायक्रॉन BA.2 मुळे आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे का? याबद्दल बोलताना कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्याने म्हटलं की BA.2 त्या लोकांना संक्रमित करू शकत नाही, ज्यांना आधीपासूनच कोविडच्या BA.1 सब व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता.

डॉ. जयदेवन यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं की ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट BA.2 मुळे आणखी एक लाट येणार नाही. बीए.२ व्हेरिएंट त्या लोकांना संक्रमित करू शकत नाही जे बीए १ ची लागण होऊन बरे झाले आहेत. हा एखादा नवीन व्हायरस किंवा स्ट्रेन नाही. तर बीए.२ हा ओमायक्रॉनचाच एक सब-व्हेरिएंट आहे.

डॉ. जयदेवन म्हणाले की ओमिक्रॉन प्रमाणेच भविष्यातील कोरोना प्रकार देखील लस रोगप्रतिकारक गुणधर्म दर्शवू शकतात. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणू आपली ताकद वाढवण्यासाठी सतत विकसित होत आहे. यामुळे याची अधिक लोकांना संक्रमित करण्याची आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि लसीकरण प्रतिकारशक्तीला पराभूत करण्याची क्षमता आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या