शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
6
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
7
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
8
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
9
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
10
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
11
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
12
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
13
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
14
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
15
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
16
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
17
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
18
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
19
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
20
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!

हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना, कोरोनाबाबत गैरसमज ठेवल्यास पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 19:23 IST

CoronaVirus News & Latest Updates : या प्रकारात लसीकरण एका मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर कोणत्याही व्हायरसपासून लोकसंख्येचा बचाव करता येऊ शकतो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी हर्ड इम्युनिटीचे सर्मथन करण्याबाबत आणि कोरोना व्हायरस पसरण्यावरून धोक्याची सुचना दिली आहे.  WHO च्या तज्ज्ञांनी हे अनैतिक असल्याचे सांगितले आहे. WHO चे प्रमुख ट्रेड्रोस अडनहॅम घेब्रियेसुस यानी सोमवारी समिती बैठकीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार हर्ड इम्यूनिटी अशी संकल्पना आहे. ज्याचा वापर लसीकरणासाठी केला जातो. या प्रकारात लसीकरण एका मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर कोणत्याही व्हायरसपासून लोकसंख्येचा बचाव करता येऊ शकतो. 

हर्ड इम्यूनिटीबाबत हा मुद्दा पटवून देताना घेब्रियेसुस यांनी कांजिण्या या आजाराचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की,  एकूण लोकसंख्येच्या  ९५ टक्के भागाला लसी दिली गेल्यास उरलेल्या ५ लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी असल्यास व्हायरपासून बचाव होऊ शकतो. तसंच याबाबत पोलियो या आजाराची सीमारेषासुद्धा ८० टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, हर्ड इम्यूनिटी व्यक्तीला धोक्यात न घातला कोणत्या व्हायरपासून सुरक्षित ठेवून  मिळवता येऊ शकते. माहामारीपासून बचाव करण्यासाठी लोक हितासाठी  इतिहासात हर्ड इम्युनिटीचा अवलंब खूप कमी प्रमाणात करण्यात आला होता. 

पुढे त्यांनी सांगितले की, ज्या व्हायरसबाबत आपल्याला पूर्ण माहिती नाही. त्या व्हायरसचा प्रसार होऊ देणं योग्य नाही. या माहामारीपासून बचावासाठी कोणताही रामबाण उपाय सापडलेला नाही. कोरोनाच्या विरोधात इम्यूनिटी विकसित करण्याबाबत माहितीचा अभाव असल्याचे सांगितले आहे.  उदा. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास शरीरात आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडी किती दिवसांपर्यंत राहू शकतात याची कल्पना नसते. जास्तीत जास्त देशांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या ही व्हायरसच्या संपर्कात आली होती. अजूनही अनेक देश व्हायरसच्या प्रसाराबाबत असंवेदनशील आहेत. मागच्या चार दिवसात अमेरिका आणि युरोपच्या काही भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. 

WHO प्रमुखांनी दिल्या कोरोनापासून बचावासाठी नव्या गाईडलाईन्स

गर्दी टाळा- जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, मैदान, नाईट क्लब, धार्मिक स्थळांसह इतर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला हवं. कारण गर्दी जमा झाल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

आजारी लोकांची काळजी घ्या- घरातील वयस्कर लोक, तसचं आजारी व्यक्तीची विशेष काळजी घ्यायला हवी. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही आणि लोकांचा जीवसुद्धा वाचवता येईल.

आसपासच्या लोकांना माहिती द्या- स्वतःला आणि इतरांनाही संक्रमणापासून वाचवण्यासाठी कोरोनाबाबतची माहिती पटवून द्यायला हवी. याशिवाय सोशल डिस्टेसिंग, मास्कचा वापर याबाबत जनजागृती पसरवायला हवी. 'या' कारणामुळे कोरोनाला रोखण्यात चीनने मारली बाजी; लोक आता बिनधास्त करतायेत पार्ट्या

सार्वजिक आरोग्यवर लक्ष : स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करता कोरोनाची लक्षणं असल्यास चाचणी करणं, स्वतःला क्वारंटाईन करणं तसंच संपर्कात आलेल्या लोकांना माहिती देऊन सावधगिरी बाळगायला सांगणं या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. रोज कापडाचा मास्क वापरता? जाणून घ्या मास्कच्या वापराबाबत समोर आलेलं नवीन संशोधन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला