शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

पुढच्यावर्षी मार्चमध्ये येणार कोरोनाची लस?; सरकारकडून 'या' प्लॅनसाठी तयारीला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 11:58 IST

CoronaVaccine News & Latest Updates : या बैठकीत कोरोना व्हायरसची लस मार्चपर्यंत लॉन्च होऊ शकते असे संकेत मिळाले. पण तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर लस कधी  येणार हे अवलंबून असेल. 

कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशांतील लसी या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यातील पोहोचल्या आहेत. भारतात 3 पैकी 2 लसी पुढच्यावर्षी मार्चपर्यंत लॉन्च होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढच्या वर्षापर्यंत कोरोनाची लस मिळण्याची अपेक्षा सरकारला आहे. गुरूवारी केंद्र सरकारचे काही मंत्री आणि लस तयार करत असलेल्या कंपन्यांमध्ये बैठक झाली.

या बैठकीत कोरोना व्हायरसची लस मार्चपर्यंत लॉन्च होऊ शकते असे संकेत मिळाले. पण तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवर लस कधी  येणार हे अवलंबून असेल. सरकारी सुत्र ईटी यांनी सांगितले की, बैठकीत लसीची वेळोमर्यादा, रेग्युलेटरी संस्थानांची मंजूरी प्रक्रिया, लसीची उपलब्धता, वितरण आणि अन्य काही मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत लस तयार करत असलेली कंपनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीया आणि झायडस कँडिलाचे वरिष्ठ अधिकारी नीती आयोगाचे  सदस्य विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सामिल झाले.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचे सचिव, आरोग्य विभाग, आयसीएमआर आणि फार्मास्युटीकल्सने १ ऑक्टोबरला झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला होता. सर्वकाही व्यवस्थित असल्यास साधारण मार्च महिन्यापर्यंत कोरोनाची लस लॉन्च केली जाऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले. 

जुलैपर्यंत भारतातील २५ कोटी लोकांना देणार कोरोनाची लस

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी 'संडे संवाद' या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. जुलै 2021 पर्यंत भारतातील कोट्यावधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना असून भारतातील  २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं होतं. 'ही' लक्षणं असतील तर तुम्हालाही असू शकतो थायरॉईड; वेळीच जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं त्यांनी सांगितले होते. एनबीटीने दिलेल्या माहितीनुसार सरकारने वर्ल्ड बँकेकडून  कर्जही घेतले आहे. कोरोनाच्या माहामारीपासून सुटका करण्यासाठी वर्ल्ड बँक, डेव्हलपमेंट बँकेकडून  १५ हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार  माहामारीपासून सुटका करण्यासाठी देशातील सगळ्या लोकांपर्यंत लस पुरवण्याचे लक्ष्य आहे. सतत मास्कच्या वापरानं शरीरात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं?, तज्ज्ञ सांगतात की....

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य