शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

Corona Vaccine चा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना झाला तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 13:00 IST

Corona Vaccine: नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही काही लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. मेडिकल एक्सपर्ट्सनी याला 'ब्रेकथ्रू केस' असं नाव दिलंय.

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या सुरूवातीच्या काळापासून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. लोकांना वाचवण्यासाठी भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये शोध सुरू आहेत. ज्यांचे निष्कर्ष सायन्स जर्नल आणि इतर प्लॅटफॉर्मवरूनही ते प्रकाशित होत आहेत. अशात नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार, कोरोना वॅक्सीनचा (Corona Vaccine) पहिला डोज घेतल्यावरही काही लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. मेडिकल एक्सपर्ट्सनी याला 'ब्रेकथ्रू केस' (Break through Case) असं नाव दिलंय. आपल्या देशाबाबत सांगायचं तर याबाबतीत भारतीय लोक बरेच नशीबवान आहेत. कारण भारतात अशा केसेस कमी आहेत.

एक्सपर्ट आणि सरकारचा सल्ला

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, भारतात अशाप्रकारच्या ब्रेकथ्रू केसेची आकडेवारी केवळ ०.०५ टक्के इतकीच आहे. तेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, जर वॅक्सीनचा पहिला डोज लावल्यानंतर कुणी कोरोनाने संक्रमित होत असेल तर याचा अर्थ हा नाही की, ती व्यक्ती दुसरा डोज घेऊ शकत नाही. अशा लोकांनी फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी की, दुसऱ्या डोजचं शेड्युल संक्रमणातून ठीक झाल्यावर म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर कमीत कमी चार ते आठ आठवड्यांनंतर असावं. (हे पण वाचा : सावधान! 'या' दोन ब्लड ग्रुपसाठी कोरोना व्हायरस जास्त घातक, मांसाहारी लोकांनाही तज्ज्ञांचा इशारा....)

 कुणासाठी हे नियम?

आरोग्य मंत्रालयानुसार, असे लोक ज्यांना कोरोना संक्रमणाची सक्रिय लक्षणे आहेत किंवा असे लोक ज्यांच्या शरीरात कोविड-१९ विरोधात अ‍ॅंटीबॉडी आहेत. त्यांच्यासाठी दुसरा डोज घेण्याआधी ४ ते ८ आठवड्यांचा गॅप गरजेचा आहे. तेच प्लाज्मा घेतलेल्या लोकांसोबत जास्त आजारी किंवा इतर आजारांनी ग्रस्त लोकांनीही वॅक्सीनचा दुसरा डोज घेण्यात एक किंवा दोन महिन्यांचा गॅप ठेवावा. (हे पण वाचा : Coronavirus: कंबर आणि पोटावरील चरबी कोरोना रिकव्हरीत बनू शकते अडथळा, तज्ज्ञ म्हणतात...)

तसेच अमेरिकन रोग नियंत्रण केंद्र म्हणजे CDC नुसार, असे रूग्ण ज्यांना काहीच लक्षणे नाहीत, म्हणजे कोविड-१९ ने ग्रस्त रूग्ण ठीक झाल्यानंतर आपला होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण केल्यावर कोरोना वॅक्सीनचा दुसरा डोज घेऊ शकतात.

दरम्यान एक्सपर्ट्सचं असं मत आहे की, वॅक्सीनच्या कार्यप्रणालीचाही आपला एक वेगळा प्रभाव असतो. सर्वांची सुरक्षा सतत आणि चांगली होत रहावी यासाठी वेगवेगळे रिसर्च सुरू आहेत. वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कुणी कोरोना व्हायरसने संक्रमित होत असेल तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य