शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
4
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
5
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
6
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
7
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
8
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
9
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
10
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
11
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
12
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
14
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
15
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
16
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
17
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
18
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
19
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
20
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...

Corona Vaccine: कोरोना लसीविषयी गैरसमजूत बाळगू नका; अफवांकडे दुर्लक्ष करा, परंतु 'हे' लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 02:02 IST

तज्ज्ञांचे मत : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून नागरिकांमधील कोरोनाची भीती निघून गेली आहे.

मुंबई : देशासह राज्यभरात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, मात्र या लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. लसीकऱणाविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमजुती असल्याचे दिसून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह स्थानिक व राज्य शासनानासह तज्ज्ञांनीही लसीविषयी गैरसमज बाळगू नका, असे आवाहन केले आहे.

कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते, नजर जाते पासून ते थेट परत आपल्या शरीरात कोरोनाचे विषाणू जातात अशा अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहेत. यामुळे लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. लसीकरण व लोकसंख्या हा अभ्यासाचा विषय आहे. कारण पोलिओचे लसीकरण करतानाही अशाच अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलिओविराेधातील लढा यशस्वी झाला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. प्रदीप शेलार यांनी सांगितले की, देशातील ६० टक्के नागरिक सोशल मीडियाचा वापर करत असून ही संख्या दर मिनिटाला वाढत आहे. फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाचा वापर तरुण पिढीमध्ये वाढत आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणामुळे होणाऱ्या साइड इफेक्टच्या बातम्या या घराघरात वाचल्या जात आहेत. त्यातून अनामिक भीती निर्माण होत असून लसीकरणातील हाच मोठा अडथळा आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून नागरिकांमधील कोरोनाची भीती निघून गेली आहे. ते बिनधास्तपणे वावरत आहेत. कोरोना संक्रमणाच्या काळातही अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या गेल्या होत्या व त्यामुळे उपचारासाठी अडथळे निर्माण झाले होते. लसीकरणाबाबतही हेच होत आहे. परंतु केंद्र व महाराष्ट्र सरकारला येत्या काळात नक्कीच यश येईल, कारण चुकीच्या बातम्यांचे आयुष्य फारच छोटे असते व आपण सर्वांनी याचा अनुभव कोरोना संक्रमण काळात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

लस घेताना हे लक्षात ठेवा

  • औषध, खाण्याचा पदार्थ किंवा कुठल्या दुसऱ्या कारणाने ॲलर्जी असेल तर तुम्ही कोव्हिशिल्डची लस घेऊ नका.
  • ताप आला असेल किंवा थॅलेसिमिया, अन्य कुठला रक्ताचा आजार असेल तर कोरोना लस घेऊ नये.
  • महिला गर्भवती आहे किंवा गर्भधारणेचा विचार करत असाल, महिला बाळाला दूध पाजत असेल, तर त्यांनी काेराेनाची लस घेऊ नये.
  • कोरोनासाठी तुम्ही यापूर्वीच एखादी लस घेतली असेल तर पुन्हा लस घेऊ नका.
  • लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ॲलर्जी झाली असेल तर दुसरा डोस घेऊ नका, असे तज्ज्ञांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस