शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: बूस्टर डोसला ग्रीन सिग्नल? २० टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडी बनली नाही, क्लिनिकल चाचणीत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 17:27 IST

कोरोना लसीकरणानंतरही २० टक्के लोकांच्या शरीरात कोविड १९ विरोधात अँन्टीबॉडी तयार झाल्या नाहीत.

ठळक मुद्देकमी अँन्टीबॉडी असलेल्या लोकांना बूस्टर डोस दिला जाऊ शकतोज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस दिलेत त्यातील अनेक लोकांची अँन्टीबॉडी पातळी चार ते सहा महिन्यानंतर कमी होताना आढळलीक्लिनिकल चाचणी अंतिम टप्प्यात आहे. भारतातील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा प्रभाव ७०-८० टक्केच आहे.

नवी दिल्ली – कोरोना लसीकरण केल्यानंतरही काही लोकांमध्ये अँन्टीबॉडी पातळी कमी असल्याचं आढळून येत आहेत. लसीकरण मानवी शरीरात अँन्टीबॉडी क्षमता वाढवण्याचं काम करते. परंतु लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अँन्टीबॉडी पातळी कमी होत असल्याचं दिसलं. त्यामुळे ज्यांच्या शरीरात लसीकरणानंतरही अँन्टीबॉडी पातळी कमी राहतेय त्या लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासेल असं रिसर्चच्या हवाल्याने एका तज्ज्ञाने सांगितले आहे.

कोरोना लसीकरणानंतरही २० टक्के लोकांच्या शरीरात कोविड १९ विरोधात अँन्टीबॉडी तयार झाल्या नाहीत. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, भुवनेश्वरच्या रिसर्च युनिटच्या २३ टक्के स्वयंसेवकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले होते. परंतु त्यांच्या शरीरात अँन्टीबॉडी पातळी आधीसारखीच राहिली. भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सचे संचालक डॉ. अजय परिदा यांनी शिफारस दिली आहे की, कमी अँन्टीबॉडी असलेल्या लोकांना बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. काही कोविड संक्रमित लोकांमध्ये अँन्टीबॉडीची पातळी ३० ते ४० हजारावर आहे. लस घेतलेल्या लोकांची संख्या ५० च्या खाली आहे. जर अँन्टीबॉडी पातळी ६० ते १०० असती तर ती अँन्टीबॉडी पॉझिटिव्ह असल्याचं मानलं जातं.

लसीच्या दोन्ही डोसनंतरही बूस्टर डोसची गरज

भुवनेश्वर येथील इन्स्टिट्यूट इंडियन SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियमचा एक भाग आहे. देशभरातील २८ प्रयोगशाळांचं एक नेटवर्क आहे. कोरोना व्हायरसच्या निर्माण होणाऱ्या व्हेरिएंटमधील जीनोम सीक्वेंस करण्यास सक्षम आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस दिलेत त्यातील अनेक लोकांची अँन्टीबॉडी पातळी चार ते सहा महिन्यानंतर कमी होताना आढळली. लसीचे दोन्ही डोस घेऊनही ज्याची निगेटिव्ह अँन्टीबॉडी असेल त्यांना बूस्टर डोसची(Booster Dose) गरज भासणार आहे.

कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन ७०-८० टक्के प्रभावी

डॉ. अजय परिदा म्हणाजे की, क्लिनिकल चाचणी अंतिम टप्प्यात आहे. भारतातील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा प्रभाव ७०-८० टक्केच आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २०-३० टक्के लोकांमध्ये अँन्टीबॉडी विकसित होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) बूस्टर डोसवर सध्या स्थगिती दिली आहे. परंतु बूस्टर डोसची शिफारस लवकरच मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी देशात ७३.७३ कोटीपेक्षा जास्त कोविड लसीचे डोस देण्यात आले अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या