शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोरोना लस घेतली अन् साईड इफेक्ट्स दिसलेच नाही, तर काय समजायचं?; तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 12:55 IST

Corona Vaccination: कोरोनाची लस घेतल्यावर साईड इफेक्ट्स दिसू लागतात. ताप, अशक्तपणा येतो. पण कोणतेच साईड इफेक्ट्स न दिसल्यास त्याचा अर्थ काय होतो..?

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळून आले. यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा तब्बल साडे तीन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धतकोरोना लसीकरणाबद्दल नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. लस घेतल्यावर एक-दोन त्रास होतो. अशक्तपणा जाणवतो. ताप येतो असं म्हटलं जातं. अनेकांच्या कुटुंबीयांनी त्याचा अनुभव घेतला आहे. त्रास झाला याचा अर्थ लस लागू पडतेय, असं म्हटलं जातं. पण कोणताही त्रास झालाच नाही तर काय, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाला जामखेडमध्ये ५ हजार कोरोना रुग्णांना बरं करणाऱ्या डॉ. रवी आरोळेंनी उत्तर दिलं.ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!लस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, काहीच साईड इफेक्ट्स दिसले नाहीत, तरीही ती लागू झाली असं आपल्याला गृहित धरावं लागेल. कारण देशात सध्या वापरात असलेल्या दोन्ही लसींच्या चाचण्यांचे निष्कर्ष अतिशय उत्तम आहेत. कोविशील्ड असो वा कोवॅक्सिन असो, दोन्ही लस अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळे शंका घेण्याचं कारण नाही. लोकांनी निश्चिंतपणे लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास किती दिवसांत कोरोना होतो, चाचणी कधी करावी, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नालाही डॉ. आरोळेंनी उत्तर दिलं. 'कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर तिसऱ्या ते पाचव्या दिवसापर्यंत लक्षणं दिसू शकतात. विषाणू शरीरात शिरल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यासाठी ४८ ते ७२ तास लागतात. आज तुम्ही संपर्कात आलात आणि उद्या लागण झाली असं होत नाही. त्यामुळे संपर्कात आले असल्यास तीन दिवसांनी चाचणी करावी. चाचणी लगेच केल्यास विषाणू आढळून येणार नाही', अशी माहिती आरोळेंनी दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या