शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावरील गोळी लवकरच बाजारात उपलब्ध, किंमत आहे 'इतकी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 17:44 IST

मॉलकोवीर 200 एमजी असं या औषधाचं नाव आहे. मुख्य म्हणजे आता ही गोळी बाजारातही तुम्हाला मिळणार आहे. नवीन वर्षात सोमावरपासूनच ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे उपलब्ध होणार आहे. यातल्या एका गोळीची किंमत ६३ रुपये इतकी असेल.

कोरोनावर गोळी कधी येणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. सध्या देशाला तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशातच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये ऑप्टीमस फार्मा आणि फायझरच्या पॅक्स्लोव्हिडनं कोरोनावरील गोळी लाँच केलीय. मॉलकोवीर 200 एमजी असं या औषधाचं नाव आहे. मुख्य म्हणजे आता ही गोळी बाजारातही तुम्हाला मिळणार आहे. नवीन वर्षात सोमावरपासूनच ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे उपलब्ध होणार आहे. यातल्या एका गोळीची किंमत ६३ रुपये इतकी असेल.

पाच दिवस दोन गोळ्यांचा डोस असं हे प्रमाण असणार आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर या गोळीची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही गोळी लाँच करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी अमेरिकन फार्मास्युटिकल दिग्गज कंपनी फायझरने अँटीव्हायरल कोविड-19 औषध अधिक परवडणारे बनवण्यासाठी करार जाहीर केला आहे. या डीलपूर्वी, या औषधाला चाचणी पास करून नियामक मान्यता मिळवावी लागणार आहे.

जर्मन लॅब बायोएनटेकसह अँटी-कोविड लस निर्माता फायझरने सांगितलं होतं की, त्यांनी रॉयल्टीशिवाय पॅक्सलोव्हिड गोळीचे उप-परवाना उत्पादन करण्यासाठी जेनेरिक औषध निर्मात्यांशी करार केला आहे. त्यामुळे, ग्लोबल मेडिसिन्स पेटंट पूल (MPP) सोबतच्या या करारामुळे जगातील ५३ टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या ९५ कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे औषध कमी किमतीत उपलब्ध होईल. हे औषध एचआयव्ही औषध रिटोनावीरसह घेतलं जाईल.

टॅग्स :Healthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या