शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

उच्च रक्तदाबावरील औषध कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी गुणकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 08:33 IST

रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढते; ब्रिटनमधील एका विद्यापीठाच्या अभ्यासातील निष्कर्ष

नवी दिल्ली : उच्च रक्तदाबावरील उपचारासाठी वापरले जाणारे औषध कोविड-१९ रुग्णांसाठी प्रभावी ठरत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. या औषधामुळे कोविड-१९ रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढते तसेच संसर्गाची तीव्रता कमी होते, असे या अभ्यासात आढळून आले आहे.

ब्रिटनमधील इस्ट अँग्लिया विद्यापीठाने २८ हजार रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. उच्च रक्तदाबावर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या ‘अँटिहायपरटेन्सिव्हज्’ औषधांचा परिणाम यात तपासण्यात आला. ‘करंट अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस रिपोर्ट्स’ या नियतकालिकात या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

कोरोना झालेले जे रुग्ण उच्च रक्तदाबावरील ‘अँजिओटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर्स (एसीईआय) अथवा अँजिओटेन्सिन सिसिप्टर ब्लॉकर्स (एआरबी)’ ही औषधी घेत होते त्यांच्यातील मृत्यूचा दर कमी असल्याचे अभ्यासात आढळून आले. इस्ट अँग्लिया विद्यापीठाच्या नॉर्विच मेडिकल स्कूलचे प्रमुख संशोधक वॅसिलिओस वॅसिलिओऊ यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी कोविड-१९ संसर्गाचा गंभीर धोका असल्याचे आपण जाणतोच.

साथीच्या सुरुवातीच्या काळात उच्च रक्तदाबावरील विशिष्ट औषधींच्या गंभीर परिणामाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्यावर काही संस्थांनी अभ्यासही केला होता. कोविड-१९ आणि एसीईआय व एआरबी यांच्याशी संबंधित १९ अभ्यासांचे विश्लेषण इस्ट अँग्लिया विद्यापीठाच्या संशोधकांनी केले. जे कोविड-१९ रुग्ण एसीईआय आणि एआरबी औषधी घेत होते तसेच जे रुग्ण ही औषधी घेत नव्हते, यांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. प्रकृती गंभीर असण्याचे प्रमाण तसेच मृत्यू या मुद्यांवर प्रामुख्याने हा अभ्यास करण्यात आला.ही औषधी प्रारंभी मानली जात होती धोकादायक

  • वॅसिलिओऊ यांनी सांगितले की, या औषधांनी कोविड-१९ चे गांभीर्य वाढते अथवा त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो, हे जे सुरुवातीला मानले जात होते, तसे आम्हाला काहीही आढळून आले नाही.
  • उलट ही औषधी घेणाºया रुग्णांत गंभीर अवस्थेत जाण्याचे तसेच त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण आम्हाला कमी आढळून आले. ही औषधी धोकादायक ठरण्याऐवजी उपकारक ठरल्याचे अभ्यासात दिसून आले.
  • एसीईआय/एआरबी घेणाºया कोविड-१९ रुग्णांत प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण ही औषधी न घेणाऱ्यांच्या तुलनेत 0.६७ पट कमी आढळून आले. वॅसिलिओऊ यांनी सांगितले की, उच्च रक्तदाबावरील ही औषधी घेणाºयांना कोविड-१९ ची लागण झाल्यास ही औषधी सुरूच ठेवण्यात यावी, अशी शिफारस आम्ही अभ्यासांती करीत आहोत. आम्ही ही शिफारस पुराव्यांसह करीत आहोत.
  • गंभीर रुग्णांना ही औषधी देणे सुरू करावे का, या प्रश्नावर मात्र आम्ही कोणतीही शिफारस करीत नाही. कारण हा विषय पूर्णत: निराळा आहे. आमचा अभ्यास आधीच सुरू असलेल्या औषधापुरता मर्यादित आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या