शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोनाला हरविले, आता मंकीपॉक्सची बारी! सीरम लस विकसित करणार, अदर पुनावालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:27 IST

Monkeypox Vaccine: जागतिक आरोग्य संघटनेनुसार कांजिण्यावरील लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरू शकतात. ही लस मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांनाच दिली जावी असेही डब्लूएचओने म्हटले आहे.

कोरोनानंतर आता मंकीपॉक्सने जगभरात खळबळ माजविण्यास सुरुवात केली आहे. भारतात कमी फरकाने चार रुग्ण सापडले आहेत. एक तर शिमल्याला जाऊन पुन्हा दिल्लीतील स्वगृही परतला होता. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. अशातच मंकीपॉक्सच्या लसीबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

कोरोनावर लसीमुळेच विजय प्राप्त करता आला होता. यामुळे भारतीय फार्मास्युटिकल इंडस्ट्री या विषाणूजन्य आजारासाठी लस आणि औषधे विकसित करण्याचा विचार करत आहे. भारतात कोव्हिशिल्ड ही लस विकसित करण्यात सीरम इन्स्टिट्यूटचा मोठा वाटा होता. ब्रिटनच्या कंपनीने जरी ही लस बनविली असली तरी त्याच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या सीरमने घेतल्या होत्या. यानंतर ही विकसित झालेली लस भारतीयांना तसेच जगभरात पुरविण्यात आली होती.

सीरमचे अदर पुनावाला यांनी सांगितले की, त्यांचा जागतिक भागीदार नोवावॅक्ससोबत मंकीपॉक्सची एमआरएनए लस विकसित करण्याचा विचार सुरु आहे. याचबरोबर डेन्मार्कची कंपनी Bavarian Nordic द्वारे निर्मित स्मॉलपॉक्सची लस आयात करण्याचा देखील विचार सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कांजिण्यावरील लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरू शकतात. ही लस मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांनाच दिली जावी असेही डब्लूएचओने म्हटले आहे. मात्र, डब्ल्यूएचओने सामुहिक लसीकरणाची शिफारस केलेली नाही. 

ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर येथील प्रख्यात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि व्हायरोलॉजिस्ट, प्रोफेसर डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, कांजिण्यांची लस मंकीपॉक्सपासून संरक्षण करते, परंतु कोणतीही भारतीय कंपनी स्मॉलपॉक्सची लस बनवत नाही. मंकीपॉक्सवर टेकोविरिमैट लस देण्याची शिफारस यूरोपीय मेडिसिन एजन्सीने केली आहे. 

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावाला