शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजमधील थंड पाणी पिताय? मग सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 18:55 IST

फ्रिजमधील पाण्याचे किंवा बर्फाचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. अनेकांना फ्रिजमधील पाणी पिणे किंवा बर्फ खाणे खुप आवडते. तुम्हाला जर बर्फाचे पाणी पिण्याची सवय असेल तर ती सवय प्रथम सोडायला हवी.

सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. उन्हाच्या झळ्यांमुळे अक्षरश: काहिली होत आहे. आॅफिस, शाळा, कॉलेजमधून घरी आलो की, तहान लागल्याने आपण पहिल्यांदा फ्रिज उघडतो अन् काही क्षणांतच पाण्याची संपूर्ण बॉटल रिकामी करतो. मात्र, तुम्हाला माहितीये का, फ्रिजमधील पाण्याचे किंवा बर्फाचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. अनेकांना फ्रिजमधील पाणी पिणे किंवा बर्फ खाणे खुप आवडते. तुम्हाला जर बर्फाचे पाणी पिण्याची सवय असेल तर ती सवय प्रथम सोडायला हवी. अन्यथा, शरीरांत होणाऱ्या  दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. आज आम्ही तुम्हाला फ्रिजमधील थंड पाणी न पिण्यामागची कारणे, दुष्परिणाम काय आहेत ते सांगणार आहोत.थंडपाणी न पिण्यामागची कारणे-* पचनशक्तीच्या कार्यात अडथळा तुमचे शरीर ठणठणीत राहायला हवे असेल तर तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निरोगी शरीरयष्टीसाठी पचनक्रिया व्यवस्थित होणे अपेक्षित असते. मात्र, थंड पाण्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या आंकुचित होतात. ज्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. पचनक्रियेवर परिणाम झाल्याने तुमच्या शरीरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे अन्नातील पोषकमुल्ये शरीराला मिळू शकत नाही. यासाठी कोमट पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.* पोषणमुल्यावर होतो परिणाम शरीराचे तापमान साधारणपणे ३७ अंश सेल्सिअस असते. पण जेव्हा तुम्ही कमी तापमान असलेले पेय पिता तेव्हा तुमच्या शरीराला बदललेले तापमान संतुलित करण्यासाठी उर्जा खर्च करावी लागते.अन्नाचे पचन करणे,पोषणमुल्ये शोषून घेणे यासाठी वापरण्यात येणारी उर्जा तापमान संतुलित करण्यासाठी वापरल्यामुळे शरीराला पोषणमुल्ये कमी प्रमाणात मिळतात.* घश्यांत इन्फेक्शनचे प्रमाण वाढतेजेव्हा तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या श्वसनमार्गामधील श्लेष्मल थराचा भाग वाढतो. या भागातील श्लेष्मल थरामुळे श्वसनमार्ग संवेदनशील होतो. ज्यामुळे विविध इनफेक्शन होऊन घसा खवखवण्याची शक्यता देखील वाढू शकते. * हार्ट रेट कमी होण्याची शक्यताथंड अथवा बर्फाचे पाणी पिण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके वाढू लागतात. संशोधनानूसार, यामुळे तुमची एक वेगस नावाची नस उत्तेजित होते. ही १० वी क्रॅनिअल नर्व्ह असल्याने ती शरीराच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवणाºया स्वायत्त मज्जासंस्थेचा एक महत्वाचा भाग असते.  ही नर्व्ह हृदयाचे ठोके कमी करण्यासाठी कारणीभूत असते.