होळी साजरी करताना सामाजिक भान ठेवणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 17:08 IST
होळीसारखे सण साजरे करण्याची गरज असल्याचे
होळी साजरी करताना सामाजिक भान ठेवणे
आजकालच्या धावत्या युगात व्यक्ती एकमेकांपासून दुरावला आहे. या टेक्नीकलच्या युगात माणसा-माणसातले संभाषण हरवत चालला आहे त्यामुळे या सर्वाना एकत्रित आणण्यासाठी होळीसारखे सण साजरे करण्याची गरज असल्याचे अभिनेत्री प्रिया बापटने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. तसेच होळी, धुलीवंदन सारखे सण साजरे करण्यासाठी पाण्याचा जास्त वापर न करता, चांगल्या क्वालिटीचे रंग वापरणे, पाण्याने भरलेल्या फुग्यांचा मार न बसविता कोरडी ओळी खेळून सामाजिक भान ठेवणे ही तितकेच गरजेचे असल्याचे देखील यावेळी प्रियाने सांगितले.