वाहक, रुग्ण व पालकांचे मार्गदर्शन शिबिर
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
आकोट : आकोट तालुक्यांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव व त्याअंतर्गत येणार्या उपकेंद्र पोपटखेड येथे सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहांतर्गत ११ डिसेंबरला वाहक, रुग्ण व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले.
वाहक, रुग्ण व पालकांचे मार्गदर्शन शिबिर
आकोट : आकोट तालुक्यांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव व त्याअंतर्गत येणार्या उपकेंद्र पोपटखेड येथे सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहांतर्गत ११ डिसेंबरला वाहक, रुग्ण व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले. या श्िबिरात सिकलसेल आजाराविषयी मार्गदर्शन, आरोग्य शिक्षण देण्यात येऊन या आजाराची लक्षणे, उपलब्ध असलेल्या चाचण्या, औषधोपचार याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. याबाबत मार्गदर्शन जयश्री भटकर तालुका सिकलसेल सहाय्यक यांनी केले. यावेळी आरोग्यसेविका सोळंके, आशा गटप्रवर्तक नाथे, लिंगोट आरोग्य पर्यवेक्षक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी).......