शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झोप येईना? हा मंत्र म्हणा आणि निवांत झोपा, आयुर्वेद विद्यापीठाकडून अफूचे सेवन करणाऱ्यावर यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 06:16 IST

Health News: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाने धर्मग्रंथात सांगितलेल्या उपचार मंत्रांवर संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी विद्यापीठात योगा थेरपी आणि मंत्र थेरपी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

जोधपूर  - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाने धर्मग्रंथात सांगितलेल्या उपचार मंत्रांवर संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी विद्यापीठात योगा थेरपी आणि मंत्र थेरपी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.

यामध्ये चार वेदांव्यतिरिक्त आयुर्वेद आणि चरक संहितेत नमूद केलेल्या वैद्यकीय मंत्रांवर संशोधन करून रोगाशी संबंधित एक प्रोटोकॉल तयार करण्यात येणार आहे.व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या रुग्णावर रात्री सुक्तम मंत्राची पहिली यशस्वी चाचणी विद्यापीठाने केली. जोधपूरच्या बासनी येथील अनिल हा १५ वर्षांपासून अफूचे सेवन करत होता. अफू सोडल्यानंतर त्याला रात्रीची झोप येईना. त्याला केवळ दीड ते दोन तास झोप येत असे. विद्यापीठातील रुग्णालयात अनिलला कानात ईअर बड घालून रात्री सुक्तम मंत्र सांगण्यात आला, जो पाच मिनिटांचा आहे. त्यानंतर आठवडाभरातच अनिलला ५ ते ६ तासांची झोप येऊ लागली.

धर्मग्रंथात लिहिलेल्या मंत्रांवर वैद्यकीय संशोधनाचे काम सुरू आहे. योगसाधनेचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. -प्रा.पीके प्रजापती, कुलगुरू, आयुर्वेद विद्यापीठ जोधपूर

अनेक आजारांवर होणार उपचार- बैठी जीवनशैली वाढल्यामुळे मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, कर्करोग आदी आजार सध्या वाढले आहेत. - हे रोग बरे करण्यासाठी उपचार मंत्रांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णाला भविष्यात त्याच्यावर औषधे घेण्याची गरज भासणार नाही. - चावण मंत्र, शावर मंत्र, गायत्री मंत्र, विष्णू सहस्त्रनाम आणि इतर मंत्रांवर विद्यापीठात संशोधन सुरू आहे.- यामुळे राग आणि तणाव कमी होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य