शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ब्रिटनने मॉडर्नाच्या लसीला दिली मंजुरी; आता 6 ते 11 वयोगटातील मुलांना मिळणार डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 15:31 IST

spikevax vaccine : कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये आता 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनाही लस दिली जाणार आहे. 

लंडन : कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये आता 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनाही लस दिली जाणार आहे. 

ब्रिटनने मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी मॉडर्ना इंका (Moderna Inca) ने विकसित 'स्पाइकवॅक्स' (Spikevax) लसीला मंजुरी दिली आहे.  6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे. ब्रिटनच्या औषध नियामक मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनुसार (MHRA) मॉडर्नाच्या स्पाइकवॅक्स लसीने सुरक्षा, गुणवत्ता आणि परिणामकारकता या निकषांची पूर्तता केली आहे.

ब्रिटनमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी स्पाइकवॅक्स आधीच मंजूर करण्यात आली होती. यानंतर लहान मुलांना ही लस देण्यास मान्यता देण्यात आली. याच्या काही तासांपूर्वी व्हॅल्नेव्हा या फ्रेंच फर्मची लस वयस्कर लोकांसाठी मंजूर करण्यात आली होती. व्हॅल्नेव्हाची लस ही सहज साठवून ठेवता येणारी कोरोना प्रतिबंधक लस आहे.

मॉडर्नाने तयार केलेल्या स्पाइकवॅक्स लसीला ब्रिटनमधील 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मंजुरी देण्यात आली आहे, हे सांगण्यास आनंद होत आहे. ही लस या वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे, असे असे एमएचआरएचे प्रमुख म्हणाले. तसेच, स्पुटनिकच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनने आतापर्यंत सहा अँटी-कोरोना लसींना मंजुरी दिली आहे. यामध्ये BioNTech/Pfizer, Johnson & Johnson, Moderna, Novavax, AstraZeneca आणि Valneva यांच्या लसींचा समावेश आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. गेल्या महिन्यात प्रत्येक 16 पैकी एक जण संक्रमित आढळला होता. हा संसर्ग दर फेब्रुवारीमध्ये नोंदवलेल्या दरापेक्षा दुप्पट आहे. फेब्रुवारीमध्ये, चाचणी करण्यात आलेल्या प्रत्येक 35 लोकांमध्ये एक कोरोना संक्रमित आढळला होता.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य