शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेन ट्रेनिंग अ‍ॅप 'डिकोडर' लॉन्च; एकाग्रता वाढविण्यासाठी करतं मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 13:21 IST

केम्ब्रिज विश्वविद्यालयातील संशोधकांनी एक खास ब्रेन ट्रेनिंग अ‍ॅप तयार केलं आहे. जे दैनंदिन जीवनामध्ये लोकांना होणारी एकाग्रतेसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.

केम्ब्रिज विश्वविद्यालयातील संशोधकांनी एक खास ब्रेन ट्रेनिंग अ‍ॅप तयार केलं आहे. जे दैनंदिन जीवनामध्ये लोकांना होणारी एकाग्रतेसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. संशोधकांच्या टिमने या ब्रेन ट्रेनिंग अ‍ॅपला 'डिकोडर' असं नाव दिलं आहे. आयपॅडवर या अ‍ॅपचं एक महिन्यापर्यंत दररोज आठ तास परिक्षण करण्यात आलं असून त्यानंतर एकाग्रतेमध्ये झालेल्या सुधारणांची नोंद करण्यात आली. 

केम्ब्रिज विश्वविद्यालयातील बिहेविरल आणि क्लिनिकल न्यूरोसायन्सच्या संशोधकांचं असं मत आहे की, या अ‍ॅपचा वापर केल्याने लोकांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक आरोग्य विभागाचे प्रोफेसर बारबरा यांनी सांगितले की, 'जेव्हा आपण ऑफिसमधून घरी परततो, तेव्हा आपल्याला जाणवतं की आपला दिवस फार धावपळीमध्ये गेला आहे. परंतु, आपल्याला हे लक्षात राहत नाही की, आपण पूर्ण दिवस नक्की काय काय केलं.'

बिहेविरल न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या शोधपत्रामध्ये त्यांनी सांगितले की, दिवसभरात अनेक कामं आपण करतो. त्यातील काही कामं सोपी तर काही तुलनेने अवघड असतात. त्याचप्रमाणे काही कामं अवघड असण्यासोबतच अत्यंत महत्त्वाची असतात. अशी कामं करताना आपल्याला एकाग्रतेची गरज असते.

संशोधनादरम्यान, संशोधकांनी 75 लोकांचे तीन गट केले. ज्यामधील एका गटाला 'डिकोडर' अ‍ॅप देण्यात आलं, तर दुसऱ्या गटाला बिंगो गेम खेळण्यासाठी देण्यात आला आणि तिसऱ्या गटाला कोणताही गेम देण्यात आला नाही. सर्व लोकांना सलग चार आठवड्यांपर्यंत अ‍ॅप आणि गेम खेळण्यासाठी सांगितले. त्यानंतर सर्व निष्कर्षांची नोंद करण्यात आली. 

संशोधकांनी केलेल्या निष्कर्षातून असं समजलं की, ज्यांनी डिकोडर अ‍ॅपचा वापर केला त्यांना बिंगो खेळणाऱ्या किंवा गेम न खेळणाऱ्यांच्या तुलनेमध्ये फायदा झाला. संशोधकांच्या टिमने सांगितले की, निष्कर्षामध्ये फक्त काही गोष्टींचेचं अंतर होते आणि त्यांचा प्रभाव मेथाफेनिडेटी किंवा निकोटीन यांसारख्या स्टिमुलसचा वापर करण्याएवढाच प्रभावी होता. 

 

टॅग्स :Researchसंशोधनtechnologyतंत्रज्ञानHealth Tipsहेल्थ टिप्स