(Image Credit : Medical News Today)
असे म्हटले जाते की, निरोगी शरीरात शांत मन आणि तल्लख मेंदुचा निवास असतो. त्यामुळे केवळ हेल्दी आहार घेणे आणि हेल्दी लाइफस्टाईल हेच गरजेचं नाही तर नियमितपणे एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम गरजेचा असतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, रोज छोट्या छोट्या एक्सरसाइज करून आपला मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. म्हणजे मेंदुच्या क्रियांमध्ये विकास होतो.
वैज्ञानिकांच्या एका टीमने उंदरावर एक रिसर्च केला. या रिसर्चमध्ये त्यांना आढळले की, रोज छोट्या छोट्या एक्सरसाइज म्हणजे मधे मधे छोट्या एक्सरसाइज केल्याने एक जीन अॅक्टिवेट होतो, याने मेंदुच्या हिप्पोकॅम्पस भागातील न्यूरॉन्समधील कनेक्शनला आणखी मजबूत केलं जातं. मेंदुचा हा भाग स्मरणशक्ती आणि शिकण्यासंबंधी असतो.
या रिसर्चमधील उंदरांना २ तासांसाठी एका रनिंग व्हिलवर ठेवलं गेलं आणि यादरम्यान त्यांच्या मेंदुच्या क्रियांचं निरीक्षण करण्यात आलं. eLife मध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये असं आढळलं की, रोज दिवसाच्या मधे मधे थोडी एक्सरसाइज केल्याने मेंदुच्या हिप्पोकॅम्पस भागात सिनेप्सेसमध्ये वाढत होते.
वैज्ञानिकांनी हा निष्कर्ष एक्सरसाइज दरम्यान अॅक्टिव केल्या गेलेल्या सिंगल न्यूरॉन्समध्ये झालेल्या वाढीचं विश्लेषण करून काढला. याआधी जनावर आणि मनुष्यांवर करण्यात आलेल्या रिसर्चमधूनही समोर आलं की, नियमितपणे एक्सरसाइज केल्याने मेंदुच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.