शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Black Fungus: तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:13 IST

Black Fungus: तीन गोष्टींमुळे वाढतोय ब्लॅक फंगसचा धोका; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता ब्लॅक फंगसचा धोका वाढला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र बघायला मिळालं. मात्र आता ब्लॅक फंगसनं (म्युकरमायकोसिस) आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. देशाच्या अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये काही समान धागे आहेत. त्यामुळे ब्लॅक फंगसचा धोका कशामुळे निर्माण होतो याची माहिती समोर आली आहे....तर मास्कमुळेच तुम्हाला ब्लॅक फंगसचा धोका; जाणून घ्या कसा कराल बचावएँटिबायोटिक्सचा वापर करणाऱ्या २१० जणांवर केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली. अँटिबायोटिक्सचा वापर कलेल्या व्यक्तींना ब्लॅक फंगसची लागण झाली. याशिवाय स्टेरॉईड्सचा वापर करणाऱ्यांनादेखील ब्लॅक फंगसचा धोका असल्याची माहिती मध्य प्रदेशच्या महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे डॉ. व्ही. पी. पांडे यांनी दिली. डॉ. पांडे यांनीच २१० रुग्णांची माहिती घेऊन ब्लॅक फंगसबद्दल एक अहवाल तयार केला आहे. ब्लॅक फंगसची लागण झालेले १४ टक्के रुग्ण स्टेरॉईड्सचा वापर करत होते, अशी माहिती अहवालात आहे. आरोग्य मंत्रालयानंदेखील ब्लॅक फंगसची लागण होण्यास प्रामुख्यानं स्टेरॉईड्स जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.कोरोना नसलेल्या लोकांनाही ‘काळी बुरशी’चा आजार होऊ शकतो?; तज्ज्ञांनी सांगितलं कारण...अँटिबायोटिक्स, स्टेरॉईड्स सोबतच ब्लॅक फंगसची लागण झालेल्यांमध्ये आणखी एक समान बाब आहे. गरम वाफ जास्त प्रमाणात घेणाऱ्यांना ब्लॅक फंगसचा अधिक धोका आहे. ब्लॅक फंगसची शिकार झालेल्या अनेकांनी जास्त प्रमाणात वाफा घेतल्या होत्या. आयएमएच्या कोच्ची चॅप्टरचे माजी प्रमुख डॉ. राजीव जयवर्धन यांनी याबद्दल धोक्याचा इशारा दिला. आपल्या शरीरावर एक थर असतो. शरीराला सूक्ष्मजंतूंपासून वाचवण्याचं काम हा थर करतो. अधिक प्रमाणात वाफा घेतल्यामुळे या थराला हानी पोहोचते आणि ब्लॅक फंगसचा धोका वाढतो, असं जयवर्धन यांनी सांगितलं.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या