शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बिस्कीट अन् खारी; साखर पडू शकते भारी! शरीरातील इन्सुलिनची पातळी असंतुलित होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:50 IST

सणासुदीच्या काळात, विशेषत: दिवाळीमध्ये भरपूर मिठाई आणि चवदार पदार्थ आसपास असल्याने ते खाण्याचा मोह आवरणे कठीण आहे.

मुंबई : नाश्त्याला चहासोबत बिस्कीट आणि खारी अधिक प्रमाणात खाणाऱ्यांची भविष्यात साखरेची चिंता वाढू शकते, अशी भीती आहारतज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. त्यातच आता दिवाळीमध्ये मैद्याने तयार केलेले फराळाचे पदार्थ खाण्यावर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम शरीरातील इन्सुलिनची पातळी असंतुलित होण्यात होऊ शकतो. दिवसाची सुरुवात खारी, बिस्किटे यासारख्या पदार्थाने करताना त्यात आढळणाऱ्या मैद्याच्या रूपात कार्बोहायड्रेट, सॅच्युरेटेड फॅट्स जरी झटपट ऊर्जा देत असले, तरी दीर्घकाळापर्यंत शरीराला कार्यक्षमतेने टिकवून ठेवू शकत नाही. तेव्हा प्रथिनांच्या महत्त्वपूर्ण स्रोताचा समावेश केल्यास दीर्घ कालावधीसाठी परिपूर्णतेची भावना निर्माण होते.

मैद्याऐवजी ज्वारी, बाजरी !सणासुदीच्या काळात, विशेषत: दिवाळीमध्ये भरपूर मिठाई आणि चवदार पदार्थ आसपास असल्याने ते खाण्याचा मोह आवरणे कठीण आहे. मात्र, आरोग्यासाठी या मैद्याच्या पदार्थ व्यतिरिक्त ज्वारी, बाजरी, कंगी तसेच राजगिरा यासारख्या आरोग्यदायी पर्यायांपासून बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा पर्याय निवडू शकतो. ज्याने फराळाच्या पौष्टिकतेमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

तासाभरात खा नाश्तावेळेत न्याहारी घेतल्याने तुमचे चयापचय सुरू होण्यास मदत होत. आवश्यक ऊर्जा मिळते, तसे न जमल्यास निदान दोन तासांत नाश्ता करण्याची शिफारस केली जाते. ही वेळ शरीराला दिवसभर न्याहारीतून मिळणारे पोषक आणि ऊर्जा प्रभावीपणे वापरण्यास उपयुक्त ठरते.

नाश्त्याला काय खावे?चणा डाळ किंवा उडीद डाळ यासारख्या कडधान्यांसह रवा तसेच बाजरी यासारख्या स्रोतांमधून कार्बोहायड्रेटसह केवळ ऊर्जाच नाही, तर दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी आवश्यक प्रथिनेही मिळतात, तसेच दिवसाची सुरुवात संपूर्ण प्रथिने, सुका मेवा आणि दुधाने केल्यासही फायदा होईल.

शरीरासाठी खाताय की मनासाठी?शारीरिक परिपूर्णतेपर्यंत खाणे आणि मानसिक समाधान होईपर्यंत खाणे यात फरक आहे. अधिक पौष्टिक धान्य आपल्या स्वयंपाकात समाविष्ट करत निरोगी भविष्यासाठी खाण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवावे. मधुमेहासारख्या चयापचयाशी संबंधित विकारांचा फारसा परिणाम न होता पुढच्या अनेक दिवाळी आनंदाने साजरी करण्याचा मार्ग मोकळा होईल.- अदिती लोटनकर, आहारतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य