शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सावधान! केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो कोरोना! रिपोर्टमधून धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 16:10 IST

Covid 19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा (Vocal Cord Paralysis) पहिला रुग्णही समोर आला आहे.

कोरोना व्हायरस दिवसेंदिवस अत्यंत घातक होत चालला आहे. आता कोरोनाचे इन्फेक्शन आपला आवाजही हिरावून घेऊ शकते, असा धक्कादायक खुलासा नुकत्याच आलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. कोरोना संक्रमण केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शखते, असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. Covid 19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा (Vocal Cord Paralysis) पहिला रुग्णही समोर आला आहे.

कोरोना आवाजासाठी किती घातक? -कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित अथवा न्यूरोपॅथिक समस्या देखील होऊ शकतात, असे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स आय अँड इयर रुग्णालयातील संशोधकांना आढळून आले आहे. यामुळेच, व्होकल कॉर्ड अर्थात आवाज नलिकेत पॅरालिसिसचे प्रकरण आढळून आले आहे. जर्नल पीडियाट्रिक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालात कोरोनामुळे होणाऱ्या इतर गंभीर समस्यांसंदर्भातही अलर्ट करण्यात आले आहे.

कोरोनानं हिरावला मुलीचा आवाज -संबंधित रिपोर्टनुसार, सार्स-सीओव्ही-2 व्हायरस संसर्गाच्या काही दिवसांनंतर, एका 15 वर्षांच्या मुलीला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला रुग्णालयात दाखल केले असता, मज्जासंस्थेवरील कोरोनाच्या दुष्परिणामामुळे तिला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस झाल्याचे निदर्शनास आहे. या मुलीला आधीपासूनच अस्थमा आणि एंक्झायटीची समस्याही होती. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, एंडोस्कोपिक तपासणीत तिच्या व्हॉइस बॉक्समध्ये आढळून येणाऱ्या दोन्ही व्होकल कॉर्डमध्ये समस्या दिसून आली.

व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा पहिला रुग्ण -अभ्यासकर्त्यांनी म्हटले आहे की, कोविड-19 च्या सुरुवातीनंतर, या वयातील व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा हा पहिलाच रुग्ण आहे. खरे तर, वृद्धांमध्ये अशा प्रकारची समस्या यापूर्वी दिसून आली आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्राध्यापक क्रिस्तोफर हार्टनिक यांचे म्हणणे आहे की, कोरोना संक्रमणामुळे डोकेदुखी, हार्ट अॅटॅक आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी सारख्या विविध प्रकारच्या न्यूरोलॉजिकल समस्या दिसून येऊ शकतात. तसेच, कोरोना व्हायरसमुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा धोकाही निर्माण होऊ शकतो, हे यावरून दिसून येते. यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वेळीच उपचार करायला हवेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य