शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

कोमट लिंबूपाणी गारेगार लिंबूपाण्यापेक्षाही अधिक फायदेशीर, अनेक गंभीर रोगांवर आहे रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 16:47 IST

आज आम्ही पारंपारिक लिंबूपाण्याला आणखी उत्तम पर्याय असलेल्या उकळलेल्या लिंबूपाण्याचे फायदे सांगणार आहोत. हे पेय तयार करण्यासाठी थंड किंवा सामान्य पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर केला जातो, एवढाच फरक आहे. 

ताजे लिंबूपाणी केवळ स्वादिष्ट आणि हायड्रेटिंग नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तुम्ही लिंबूपाणी विविध प्रकारे तयार करु शकता. आज आम्ही पारंपारिक लिंबूपाण्याला आणखी उत्तम पर्याय असलेल्या उकळलेल्या लिंबूपाण्याचे फायदे सांगणार आहोत. हे पेय तयार करण्यासाठी थंड किंवा सामान्य पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर केला जातो, एवढाच फरक आहे. 

लिंबूपाण्याची पौष्टिक सामग्रीया पेयातील दोन मुख्य घटकांपैकी एक असलेले लिंबूपाणी व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. एका लिंबाचा रस फ्लेव्होनॉइड्समध्ये समृद्ध आहे, ज्यामध्ये रोगाशी लढण्याचे शक्तिशाली गुणधर्म आहेत. या पेयात चरबी, कर्बोदके, साखर कमी आहे, परंतु त्यात पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन बी यासह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. लिंबूपाण्याच्या प्रत्येक ग्लासचे पौष्टिक मूल्य त्यावर किती लिंबाचा रस टाकला गेला आहे आणि त्यावर जोडलेले इतर घटक यावर अवलंबून आहे.

आहार संबंधित मार्गदर्शकानुसार, १९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी ७५ मिलीग्राम व्हिटॅमिन सी घ्यावे आणि १९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांसाठी ते दररोज ९० मिलीग्राम आहे. धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना दररोज अधिक व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते.

त्वचेची स्थिती सुधारतेव्हिटॅमिन सी ने समृद्ध असल्याने लिंबुपाण्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान तुमच्या त्वचेचे संरक्षण करू शकते. हे वृद्धत्वाची चिन्हे, त्वचेवरील सुरुकुत्या कमी करू शकते आणि मुरुमांना कमी करू शकते. व्हिटॅमिन सीचे सेवन जखमा जलद भरण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करू शकते. याचे दररोज सेवन केल्याने तुमची त्वचा तरूण आणि चमकदार दिसू शकते.

रक्तदाब कमी करतेलिंबाध्ये अनेक खनिजे असतात जे रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कॅल्शियम आणि पोटॅशियम हे दोन्ही उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब कमी करू शकतात. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की लिंबूपाणी रक्तदाब लवकर सामान्य मर्यादेत आणण्यास मदत करू शकते.

प्रतिकारशक्ती वाढवतेव्हिटॅमिन सी मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म देखील आहेत. हे पेय दररोज प्यायल्याने कोविड आणि फ्लू सारख्या श्वसन विकारांपासून संरक्षण मिळू शकते. तुमच्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही करू शकता अशा सर्वात सोप्या गोष्टींपैकी एक म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे.

पचन सुधारतेजर तुम्ही बऱ्याचदा बद्धकोष्ठता, सूज येणे किंवा छातीत जळजळ या समस्येने ग्रस्त असतील तर जेवणानंतर एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. गरम पाणी प्यायल्याने तुमचे चयापचय वाढते आणि काही किलो जळण्यास मदत होते.

ते कसे तयार करावे?उकळलेले लिंबूपाणी तयार करण्यासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत. तुम्ही नेहमी त्यावर प्रयोग करू शकता आणि चव सुधारण्यासाठी तुम्हाला आवडेल तितके साहित्य टाकू शकता. लिंबूपाणी  तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत.

पद्धत-१एक लिंबू अर्धा कापून घ्या आणि रस काढण्यासाठी ते चांगले पिळून घ्या. एका ग्लास उकळलेल्या पाण्यात रस मिसळा आणि पिण्यापूर्वी थंड होऊ द्या.

पद्धत-२एका लिंबाचे काप करून त्याचे तुकडे एका कपात उकळलेल्या पाण्यात घाला. ते पिण्यापूर्वी थोडा वेळ थंड होऊ द्या.

़लिंबूपाणी हे एक स्वादिष्ट पेय आहे ज्यात काही आश्चर्यकारक आरोग्य फायदे देखील आहेत. तुमच्या आहारात याचा समावेश केल्यास हायड्रेटेड राहण्यासही मदत होईल. हे पेय सर्वसाधारणपणे प्रत्येकासाठी वापरण्यास सुरक्षित असते, परंतु जास्त प्रमाणात घेतल्याने कालांतराने दात खराब होऊ शकतात आणि पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. दिवसातून एक किंवा दोन ग्लास उकळलेले लिंबू पाणी प्या. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स