शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

आनंदी अन् दु:खी होण्यासाठी जबाबदार असतो 'हा' हार्मोन, जाणून घ्या याचे फायदे आणि प्रमाण वाढवण्याचे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 11:48 IST

तुम्हाला नेहमी आनंदी, हसत आणि चिंतामुक्त रहायचं असेल तर सेरोटोनिन हार्मोन तुमची मदत करू शकतो. हा एक असा हार्मोन आहे, ज्याने तुमचा मूड सुधारता येतो.

(Image Credit : cuded.com)

तुम्ही आनंदी राहता, हसत राहता तेव्हा याचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. तुम्ही जेवढे जास्त आनंदी रहाल तेवढा तणाव तुमच्यापासून दूर राहील. निराश रहाल, चिंतेत रहाल किंवा टेन्शनमध्ये रहाल तर अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागेल. सतत निराश आणि चिंतेत रहाल तर तुम्हाला डिप्रेशनची समस्या होऊ शकते. अशात तुम्हाला नेहमी आनंदी, हसत आणि चिंतामुक्त रहायचं असेल तर सेरोटोनिन हार्मोन तुमची मदत करू शकतो. हा एक असा हार्मोन आहे, ज्याने तुमचा मूड सुधारता येतो. अनेकदा शरीरात सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं. अशात काही पदार्थांचं सेवन करून आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता. 

काय आहे सेरोटोनिन?

सेरोटोनिन एकप्रकारचं रसायन आहे. जे मेंदूतून रिलीज होतं. हे रसायन अमीनो अॅसिड ट्रिप्टोफॅनपासून तयार होतं. हे अमीनो अॅसिड तुम्ही काही पदार्थांच्या माध्यमातूनही सेवन करू शकता. नट्स, पनीर आणि अळशीच्या बीया यांसारख्या पदार्थांमध्ये आढळतं. जेव्हा शरीरात ट्रिप्टोफॅनची कमतरता होऊ लागते, तेव्हा सेरोटोनिनचं प्रमाण कमी होऊ लागतं. याच कारणाने तुम्ही चिंतेत, निराश, तणावग्रस्त होता. सेरोटोनिनला फील गुड हार्मोनही म्हटलं जातं. सेरोटोनिनने तुमचा मूड, भूक, झोप, शिकण्याची क्षमता वाढते आणि स्मरणशक्ती संबंधी कार्यांनाही नियंत्रित करतं.

सेरोटोनिनचं कार्य

- पचनक्रिया मजबूत करणे

- सेरोटोनिन तणाव दूर करून मूड चांगलं करतो

- मेंदूतील झोपेशी संबंधित भाग चांगले ठेवतो

- घाव भरण्यास मदत करतो आणि हाडांना मजबूती देतो

- जेव्हा सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं, तेव्हा तुम्हाला दु:खाची आणि निराशेची जाणीव होऊ लागते. हा हार्मोन सुख-दु:खाचा अनुभव देण्यासाठी एक हॅप्पी न्यूरोट्रान्समीटर प्रमाणे काम करतं.

(Image Credit : bridgestorecovery.com)

- जवळपास ९५ टक्के सेरोटोनिन आपल्या आतड्यांमध्ये आढळतं. याने आतड्यांची क्रिया कंट्रोल होते. तसेच याने रक्तदाबही कंट्रोलमध्ये राहतो.

- सेरोटोनिनमुळे स्मरणशक्तीही वाढते. याने हानिकारक बॅक्टेरिया नियंत्रित करणे आणि आजारांशी लढण्यासाठीही मदत होते.

- जेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढतं, तेव्हा चांगली झोप येते. झोपेतून उठल्यावर तुम्हाला आळस जाणवू लागतो. पोटाचा आजार जसे की,  इर्रिटेबल बॉउल सिंड्रोममध्ये सेरोटोनिनची मोठी भूमिका असते. याने भूकही वाढते.

सेरोटोनिन हार्मोन वाढवण्याचे उपाय

- नियमित एक्सरसाइज केल्याने सेरोटोनिन हार्मोन वाढवता येतात. दररोज अर्धा तास हलकी एक्सरसाइज आणि योगाभ्यास करून शरीरात सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढू लागतं.

(Image Credit : health.clevelandclinic.org)

- थोडा वेळ उन्हात राहिल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघते. इतकेच नाही तर सेरोटोनिनचं हार्मोनचं प्रमाण देखील नियंत्रित राहतं. 

- कार्बोहायड्रेटयुक्त डाएटचं सेवन करावं. कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थ जसे की, मोहरीचं तेल, अळशीच्या बीया, गहू, राजमा, मेथी, सोयाबीन, हिरव्या भाज्यांचं सेवन करून सेरोटोनिनचं प्रमाण वाढू शकतं. त्यासोबतच किवी, केळी, आंबे अननस ही फळेही खाऊ शकता.

(टिप : वरील लेखातील उपाय हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. हे फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यामुळे स्वत:च्या मनाने काहीही करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य