शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उन्हाळ्यात सब्जाचं जास्त सेवनही ठरू शकतं त्रासाचं; वैद्यांनी दिला याबाबत खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 15:58 IST

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. पण काहींना सब्जाच्या अतिसेवनाने त्रासही होऊ शकतो. तेच जाणून घेऊ..

उन्हाळा आता जास्तच जाणवायला लागला आहे. यामुळे गरमी आणि घामामुळे लोक हैराण असतात. अशात शरीर थंड करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पेयांचं सेवन करतात. या दिवसांमध्ये सब्जा खाण्याचे किंवा पिण्याचे भरपूर फायदे सांगितले जातात. कारण सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. हे सगळे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. 

सरबत, फालुदा, कोशिंबीर अशा विविध पदार्थांमध्ये सब्जा खाता येतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. पण सब्जा सगळ्यांसाठीच फायदेशीर असतो असं नाही. काही लोकांसाठी सब्जाचं सेवन त्रासाचं ठरू शकतं. आयुर्वेद वाचस्पति वैद्य परीक्षित शेवडे यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

1) उन्हं वाढत असल्याने शरीराला थंडावा म्हणून कित्येकजण सब्जा खात आहेत. सध्या वसंत ऋतू सुरू आहे. हा निसर्गतः कफ वाढण्याचा काळ असल्याने नियमितपणे सब्जा खाणाऱ्यांना सर्दी खोकल्याचे त्रास बळावू शकतात. 

2) सब्जा हा पचायला जड आहे. नियमितपणे खाल्ल्यास उन्हामुळे आधीच कमी झालेली भूक आणखीच मंदावते. त्यामुळे जे नियमित व्यायाम करतात, ज्यांची भूक आणि पचनशक्ती उत्तम आहे त्यांनी खाण्यास हरकत नाही. इतरांनी मात्र; क्वचित् कधीतरी आणि कमी मात्रेत सेवन करणंच योग्य. 

 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealth Tipsहेल्थ टिप्स