शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्ट्रॉल कमालीचे कमी करतात हे छोटेसे दाणे, आरोग्यवर्धक इतके की अनेक आजारांवर रामबाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2022 19:47 IST

मेथी ही फक्त कोलेस्ट्रॉलसाठीच नाही तर मधुमेह, वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. जाणून घेऊया मेथीचे इतर फायदे कोणते?

चवदार भाज्यांपैकी एक असलेली मेथी आपल्या गुणधर्मामुळे देशातच नाही तर परदेशातही चर्चेत आहे. मेथीचा वापर वर्षानुवर्षे औषध म्हणूनही केला जातो. मेथीमध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो, ज्यामुळे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. अनेक संशोधनांमध्ये असेही आढळून आले आहे की, मेथी फक्त केस आणि त्वचेसाठी खास नाही तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. मेथीचा पराठा असो किंवा मेथीची भाजी असो, प्रत्येकाचे आरोग्यासाठी समान फायदे आहेत. मेथी ही फक्त कोलेस्ट्रॉलसाठीच नाही तर मधुमेह, वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. जाणून घेऊया मेथीचे इतर फायदे कोणते (Benefits Of Fenugreek) आहेत.

मासिक पाळीच्या वेदना -health.com च्या माहितीनुसार, अनेक मुली आणि महिलांना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना सहन कराव्या लागतात. मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास आणि पेटके कमी करण्यासाठी मेथी खाणे फायदेशीर ठरू शकते. मेथीमुळे पोटदुखीवर आराम तर मिळतोच, पण थकवा, डोकेदुखी, मळमळ, चक्कर यासारख्या समस्याही कमी होतात.

ब्रेस्ट मिल्क वाढण्यास मदत होते -आईचे दूध वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे नव मातांना मेथी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. मेथीमध्ये असलेले पोषक घटक आईचे दूध वाढवण्यास मदत करतात. प्रसूतीनंतर, नवीन मातांना मेथीचे लाडू आणि पाणी दिले जाते, जे त्यांच्या अनेक समस्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते -मेथी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास मदत करू शकते. हे संप्रेरक कमी असल्याने पुरुषांमध्ये चिडचिड होणे, एकाग्रता न राहणं आणि हाडे कमकुवत होण्याचे प्रकार दिसून येतात. वयाच्या 45 वर्षानंतर पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते. मेथीचे नियमित सेवन केल्यास 10 ते 12 आठवड्यांत ही पातळी 46 टक्क्यांनी वाढू शकते.

कोलेस्टेरॉलची पातळी -शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मेथीचा वापर केला जाऊ शकतो. मेथीमुळे हृदयाच्या समस्या आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. त्यासाठी मेथीचा फायदा होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स