शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात मटार खाल्ल्याने तुमची 'ही' समस्या होईल दूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 17:52 IST

हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाच एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जास्त भाज्या खायला मिळतात.

 हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाच एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला  जास्त भाज्या खायला मिळतात. नेहमीपेक्षा स्वस्त आणि ताजे मटार बाजारात दिसतात. त्यामुळे आपण फ्रोजन मटार खाण्यपेक्षा ताजे मटार स्वयंपाक करताना वापरु शकतो. चला तर जाणून घेऊया हिरवे मटार खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे काय आहेत. 

मटारचे त्वचेच्या सौंदर्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. मटारची पेस्ट करून तिचा वापर स्क्रब सारखाही करतात, यामुळे त्वचा उजळते. हिरवा मटार खाल्याने स्मरणशक्ती वाढते. याशिवाय  तणाव, डिप्रेशन यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. शक्य असल्यास तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. किंवा भाजी करून आणि उकडून सुद्धा खाऊ शकता.

पोट साफ होत नसल्यास मटार  खूप फायदेशीर आहे. हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅट सांधेदुखी संबंधित समस्यांमध्ये फायदेशीर ठरतात. मटारमध्ये असलेलं प्रोटीन हाडांच्या मजबुतीसाठी मदत करतं. ताज्या हिरव्या वाटाण्यामध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात. यात शरीरासाठी आवश्यक असणारे  पोषक घटक देखील असतात.यात फायबर, फ्लेव्होनॉइड्स, स्टार्च आणि प्रथिने देखील असतात. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मटारचे सूप प्यायल्यास रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

हिरव्या मटारमध्ये असे गुण आहेत जे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हलला वाढू देत नाही. मटारच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉल संतुलित राहतो. हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतं, ज्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून लढण्यास मदत मिळते. 

हृदयरोगांनी ग्रस्त लोकांसाठी मटारचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करु शकतो. मटारमध्ये सूज कमी करणारे अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात. याने हृदय निरोगी राहतं. मटारमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे केसगळती रोखली जाऊ शकते. तसेच केस मुलायम आणि मजबूत होण्यासही मदत मिळते. त्यासोबतच यात असलेल्या व्हिटॅमिन बी ६, बी १२ आणि फॉलिक अॅसिड लाल रक्तपेशी तयार करण्यास फायदेशीर ठरतात. यामुळे केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्या