शहरं
Join us  
Trending Stories
1
गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
2
माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
5
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
6
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
7
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
8
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
9
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
10
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
11
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
12
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
13
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
14
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
15
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
16
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
17
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
18
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
19
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
20
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

वजन कमी करण्यासह दातांच्या समस्येवर फायदेशीर तुळशीचं पाणी, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:54 IST

तुळशीच्या पाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत.

तुळशीच्या पाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. अनेक घरगुती उपायांमध्ये तुळशीचा वापर  मोठ्या प्रमाणावर केला जातो. आज आम्ही तुम्हाला तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही  आजारी पडण्यापासून स्वतःला वाचवू शकता. यात जीवनसत्व अ, ब आणि अनेक पोषके आहेत याचे तेल एक जैवप्रतिरोधी मानलं जाते त्यामूळे याचा वापर विविध आजारांवरही केला जातो . चला तर मग जाणून घेऊया काय आहेत तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे.

शरिरातील टॉक्सीन्स बाहेर निघून जातात

आपल्या शरिरातील विषारी घटक बाहेर फेकण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो.  शरीरात जे पदार्थ निष्क्रीय पडून असतात. त्यामुळे शरिराचं नुकसान होत असतं. तुळशीच्या पाण्याचे सेवन केले तर काहीही न करता तुमच्या शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडण्यास मदत होईल.  तुळशीत असणारे एंटीऑक्सीडेंट्स  तुमच्या शरीरातील पचनक्रिया व्यवस्थीत करण्यासाठी लाभदायक ठरतं असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत  होते. 

फुप्पुसांच्या आजारापासून मिळेल  सुटका

तुळशीच्या पानांमध्ये अनेक मिनरल्स असतात. जे तुम्हाला श्वास आणि  फुप्पुसांशी निगडीत आजारांना दूर ठेवण्यासाठी लाभदायक असतात तुळशीचे अर्क असलेले पाणी प्यायल्याने तुमच्या समस्या दूर होतील. तुळशीत एंटी-एलर्जिक  गुण शरीरात आतल्या भागांना आलेले सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील. ( हे पण वाचा-थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करणे सोडाल!)

दात दुखीपासून मिळेल आराम

पानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर उपचार म्हणून तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तूळस पाने ५ ते१० मिनीटं तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद  ग्रंथांमध्ये  दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते. दात ठणकत असेल तर चोळून तूळशीची पानं ठणकेवर ठेवल्यास ठणकेवर आराम मिळतो. (हे पण वाचा-त्वचा रोगासह ताण-तणावाचं कारण ठरू शकतो सोरायसिस, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

जर तुमच्या शरीरावर अतिरीक्त चरबी जमा झाली असेल तर वजन तसंच चरबी कमी करण्यासाठी तुळशीची पान लाभदायक ठरतील. कारण फॅट्स कमी करण्यासाठी आवश्यक असलेले घटक तुळशीच्या पाण्यात असतात. 

तुळशीचे पाणी कसं तयार करा

तुळशीची पाच ते दहा पानं घ्या. २ कप पाणी उकळत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात तुळशीची पानं घाला.  ३ ते ४ मिनटं तुळशीची पानं घातलेलं पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर या पाण्याचे सेवन करा. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स