शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जंक फूड, कलरिंग अन् तणावामुळे पडतेय टक्कल; ३० वर्षे वयातच येऊ लागल्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 07:10 IST

तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे ४० वर्षांनंतर टक्कल पडण्याची समस्या आनुवंशिक प्रकरणांमध्ये निर्माण होते, परंतु आता मोठ्या संख्येने तरुणांना याचा त्रास होत आहे.

नवी दिल्ली : स्टायलिश लूकच्या नादात केसांना कलर करण्यापासून ते वारंवार स्ट्रेटनिंग करणे, तणाव आणि थायरॉइडचे आजार हे टक्कल पडण्याची कारणे ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, साधारणपणे ४० वर्षांनंतर टक्कल पडण्याची समस्या आनुवंशिक प्रकरणांमध्ये निर्माण होते, परंतु आता मोठ्या संख्येने तरुणांना याचा त्रास होत आहे.

काही तरुणांचे केस समोरून तर काहींचे मागून गळत आहेत. ३० ते ४० वयोगटातील लोकांना टक्कल पडण्याची मोठी प्रकरणे सध्या समाेर येत आहेत. त्यामुळे तरुणांनी तणावासह नको त्या गोष्टी टाळणे गरजेचे झाले आहे.

केस गळतीची इतर कारणेटक्कल पडण्याच्या इतर मुख्य कारणांमध्ये तणाव, संतुलित आहाराचा अभाव, हार्मोनल बदल, आनुवंशिक समस्या, प्रदूषण यांचा समावेश होतो. केस कमी होत असल्यास, त्यांची तपासणी करून आणि कारण शोधून समस्या सोडवली जाऊ शकते.

महिलांमध्येही समस्या : महिलांनाही टक्कल पडण्याच्या समस्येने ग्रासले आहे. तणाव, विस्कळीत दिनचर्या, अधिक प्रमाणात रंग देणे, स्टायलिंग आणि केमिकलमुळे केस कमकुवत होत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये, औषधांच्या सेवनामुळे हार्मोनल असंतुलन देखील होत आहे.

या कारणांमुळे गळताहेत केस- जंक फूडचे अतिसेवन- प्रदूषित वातावरणाचा अतिरेक- जास्त मानसिक किंवा शारीरिक ताण- संतुलित पोषण आहाराचा अभाव- जीवनशैलीतील बदलामुळे हार्मोनल संतुलन बिघडणे.- थायरॉईड, पीसीओडी सारखे आजार- कौटुंबिक इतिहास- दारूचे सेवन

तरुणांमध्ये रंग देणे, स्ट्रेटनिंग मधील केमिकलमुळे होणारे नुकसान, फंगल इन्फेक्शन, अधिक तणाव, हार्मोनचे असंतुलन, ऑटो इम्यून डिसऑर्डर अशा कारणांमुळे टक्कल पडण्याची समस्या वाढत आहे. पुरुषांबरोबरच महिलांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण वाढत आहे.  - डॉ. सृष्टी त्रिपाठी, त्वचारोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य