शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गव्हाच्या पिठात 'ही' एक गोष्टी टाकून बनवा चपात्या, बॅड कॉलेस्ट्रोल शरीरातून सहज पडेल बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 16:39 IST

Bad Cholesterol: आपल्याच काही चुकामुळे शरीरात जर बॅड कॉलेस्ट्रोल वाढलं तर जीवाला धोका होऊ शकतो.

Bad Cholesterol: आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे लोकांमध्ये बॅड कॉलेस्ट्रोलचं प्रमाण वाढत आहे. कमी वयातही ही समस्या भेडसावत आहे. हा एकप्रकारचा मेणासारखा पदार्थ असतो जो शरीरात वाढला तर रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतो. यामुळे रक्त पुरवठा जर व्यवस्थित झाला नाही तर  हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शिवाय सुस्त लाइफस्टाईलमुळेही कॉलेस्ट्रोल वाढतं.  

हाय कॉलेस्ट्रोलला सायलेंट किलर मानलं जातं. कॉलेस्ट्रोल दोन प्रकारचे असतात एक गुड कॉलेस्ट्रोल आणि दुसरं बॅड कॉलेस्ट्रोल. गुड कॉलेस्ट्रोल शरीरासाठी आवश्यक आहे. पण आपल्याच काही चुकामुळे शरीरात जर बॅड कॉलेस्ट्रोल वाढलं तर जीवाला धोका होऊ शकतो. बॅड कॉलेस्ट्रोल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं आणि रक्त पुरवठा खंडीत करतं. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. 

काय आहे उपाय?

हेच वाढलेलं कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी डाएटमध्ये आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोक गव्हाच्या पिठाची चपाती खातात. अशात या गव्हाच्या पिठात जर काळ्या चण्यांचं पीठ टाकून चपाती बनवली आणि त्याचं सेवन केलं तर कॉलेस्ट्रोल कमी करण्यास मदत मिळते. काळ्या चण्यांमध्ये फायबर प्रमाण भरपूर असतं आणि सोबतच अनसॅचुरेटेड फॅट्सही असतं. जे कॉलेस्ट्रोल कमी करण्यास फायदेशीर ठरतं. केवळ कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठीच नाही तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही चणे आणि गव्हाच्या पिठापासून तयार चपात्या फायदेशीर ठरतात.

काळे चणे वेट मॅनेजमेंट करण्यास मदत करतात. काळ्या चण्याच्या पिठापासून तयार चपात्या खाल्ल्याने पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. यामुळे जास्त भूकही लागत नाही आणि फूड इंटेकही कमी होतं. पचन चांगलं ठेवण्यासाठीही काळे चणे फायदेशीर मानले जातात. अशात गव्हाच्या पिठात तुम्ही काळ्या चण्याचं पीठ रोज नाही टाकलं आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळाही टाकलं तरी चालू शकतं. याने हाय कॉलेस्ट्रोल कमी होईल आणि पचन तंत्रही चांगलं राहतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग