शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात दही आणि इतर आंबट पदार्थ खावीत का? वाचा काय सांगतं आयुर्वेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 10:56 IST

Ayurveda Tips for Monsoon Food: आयुर्वेदात आजारी न पडण्यासाठी काय करावं किंवा कोणती औषधं घ्यावी हे सांगितलं जातं. या हिशेबाने आयुर्वेद आपल्याला शरीर फीट ठेवण्यासाठी आणि उपाचाराचे उपाय सांगतं.

Ayurveda Tips for Monsoon Food: पावसाळा सुरू होताच अनेकांना खोकला, सर्दी, गळा खऱाब होणे, कफ किंवा ताप अशा समस्या सुरू होतात. अनेकांच्या लक्षात येत नसेल की, असं का होत आहे. याचं कारण वातावरण नाही तर तुमचा आहार असतो. आयुर्वेदानुसार, वातावरण बदलताच आपल्याला आहारातही बदल करायला हवा. असं केलं नाही तर त्या आहाराचे गुण बदलतात आणि त्यांचे फायदे होण्याऐवजी नुकसान अधिक होतात.

आयुर्वेदात आजारी न पडण्यासाठी काय करावं किंवा कोणती औषधं घ्यावी हे सांगितलं जातं. या हिशेबाने आयुर्वेद आपल्याला शरीर फीट ठेवण्यासाठी आणि उपाचाराचे उपाय सांगतं. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात  पोटातील पचन अग्नि कमजोर होते. अशात आहारात बदल करणं गरजेचं असतं. जे आपल्या शरीराला उष्णता देतील आणि पचनक्रियेत मदत करतील असेच पदार्थ खायला हवेत.

पावळ्यात आंबट पदार्थ खावेत का?

हेच कारण आहे की,  पावसाळ्यात दही, लोणचं किंवा इतर आंबट पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. अशाप्रकारचे चिकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. या पदार्थांमुळे पावसाळ्यात कफ तयार होतो, ज्यामुळे खोकला येतो. सोबतच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात या पदार्थांचं सेवन केलं तर घसा खराब होतो, पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो. 

गरम मसाल्यांचा जास्त वापर

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सुंठ, हींग, काळे मिरे आणि गव्हाचं सेवन करावं. पावसाळ्यात शरीरातील दोष दूर करण्यासाठी चटकदार आणि गोड पदार्थ खावेत. गव्हाच्या चपात्या खाव्यात. ज्याने शरीराला आतून उष्णता मिळते.

आलं, लवंग, वेलचीचे फायदे

पावसाळ्यात अनेक सण-उत्सव असतात. या दरम्यान तयार केलेल्या मिठायांमध्ये मखाना, चिरंजी, कलिंगडाच्या बीया, खोबरं आणि कमळाच्या बियांच्या वापर केला जातो. या दिवसांमध्ये आलं, लवंगसहीत इतरही गरम मसाल्यांचं सेवन वाढवलं जातं. ज्यामुळे आपल्या शरीराला या दिवसात पोषण मिळतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशल