शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या चेहऱ्यावर दिवसातून सरासरी ६२ वेळा फुलतं हसू; पुरुष केवळ ८ वेळाच हसतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 11:29 IST

हास्याचा संबंध थेट मेंदूशी असल्यानं त्याचे अनेक फायदे आहेत; हसण्यामुळे शरीराला कित्येक लाभ होतात

तुम्ही दिवसातून किमान एखाद्या अनोळखी व्यक्तीला उगाच स्माईल द्या. दिवसभर ती व्यक्ती तुमचा विचार करत राहील. ती व्यक्ती माझ्याकडे पाहून का हसली, मी तिला ओळखतो का, याचा विचार दिवसभर त्या व्यक्तीच्या मनात सुरू राहील. याचं कारण एका स्माईलमागे दडलंय. हसण्यात प्रचंड पॉझिटिव्ह उर्जा आहे. हसण्यामुळे ताणतणाव दूर होतो. माणसं जोडली जातात. त्यामुळेच तर कायम आनंदी राहा. हसत राहा, असं म्हटलं जातं.तुम्ही जितकं आनंदी राहाल, हसतमुख हसाल, तितका तुमचा मेंदू उत्तम स्थितीत राहतो. कारण हास्याचा संबंध थेट मेंदूशी असतो. एका हास्यामुळे बरंच काही घडू शकतं. तुमच्या एका हास्यामुळे कोणाचातरी दिवस अविस्मरणीय होऊ शकतो. हास्यामुळे तुमचा स्वत:चा दिवसदेखील अतिशय उत्तम जाऊ शकतो. हास्यामुळे आत्मविश्वास मिळतो. त्यामुळेच १९९९ पासून जागतिक हास्य दिन साजरा होऊ लागला.फुफ्फुसांना मजबूत अन् आजारांपासून लांब ठेवायचं? मग वेळीच 'या' पदार्थांपासून ४ हात लांब राहासध्या संपूर्ण जग कोरोना संकटातून जातंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरतोय. हास्याचा फैलावदेखील तितक्याच वेगानं होतो, असं अनेक सर्वेक्षणांतून समोर आलं आहे. एक महिला साधारणत: दिवसातून सरासरी ६२ वेळा हसते. तर पुरुषांच्या चेहऱ्यावर दिवसातून केवळ ८ वाजता हास्य फुलतं. हसण्यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी होतो. तुम्ही फोनवर बोलताना हसत असाल, तर समोरील व्यक्ती अधिक मैत्रीपूर्ण भावनेतून तुमच्याशी संवाद साधते.तुम्ही जेव्हा हसता, तेव्हा २२ स्नायू काम करतात. तर ज्यावेळी तुमच्या कपाळाला आठ्या पडतात, त्यावेळी कार्यरत असलेल्या स्नायूंची संख्या ३७ इतकी आहे. त्यामुळे थोडक्यात हसण्यानं तुमच्या शरीराची ऊर्जादेखील वाचते. म्हणूनच तर जॉर्ज एलियॉट यांनी 'चेहऱ्यावर हास्य ठेवा अन् मित्र बनवा. चेहऱ्यावर आठा पाडा अन् सुरकत्या मिळवा,' असं म्हटलंय. त्यामुळे तुम्हाला मित्र हवेत की सुरकुत्या हे तुमचं तुम्हीच ठरवा.